|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » भारताकडे वक्रदृष्टी टाकण्याची शत्रूही हिंमत करत नाही : मोदी

भारताकडे वक्रदृष्टी टाकण्याची शत्रूही हिंमत करत नाही : मोदी 

ऑनलाईन टीम / नाशिक :

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला निवडून दिल्यानेच भारताकडे वक्रदृष्टी टाकण्याची आता शत्रूसुद्धा हिंमत करत काही. देशाचा जगात जयजयकार केवळ जनतेच्या मतदानामुळे शक्मय झाल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा झाली. या सभेत ते बोलत होते. मोदी म्हणाले, देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या मुद्यावर मी चर्चा करतो मात्र, काहींना तो विजेचा धक्का आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाचा टक्का आणि मिळणारे संदेश हादरवून सोडणारे आहेत, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. तसेच शेतकऱयांसाठी कांद्यावरील निर्यात मूल्य कमी करण्यात येणार असल्याचेही मोदींनी सांगितले.