|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » विधानसभा निवडणुकांवेळी मनसेची रणनिती स्पष्ट करेन : राज ठाकरे

विधानसभा निवडणुकांवेळी मनसेची रणनिती स्पष्ट करेन : राज ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात सभांचा विडाच उचलला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

आपल्या सभांमध्ये व्हीडिओच्या माध्यमातून मोदींच्या भाषणाच्या क्लिप दाखवून मोदींना त्यांच्या कामाची आणि जुन्या आश्वासनांची आठवण राज ठाकरे करुन देत आहेत. त्यामुळे ते भाजपच्या रडारवर आहेत. अशाच परिस्थित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांशी त्यांची जवळीक वाढली आहे. त्यामुळे मनसे विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार का अशा प्रश्नांना राजकीय वर्तुळात उधान आले आहे. राज आणि पवार यांच्या वाढलेल्या जवळीकतेमुळे एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज म्हणाले, शरद पवारांनीच माझं बोट धरलं आहे. विधानसभा निवडणुकांची रणनिती तेव्हाच स्पष्ट करेन, असेही राज म्हणाले.