|Monday, August 26, 2019
You are here: Home » उद्योग » भारतात 2021 पर्यंत शीतपेयांचा खप होणार दुप्पट!

भारतात 2021 पर्यंत शीतपेयांचा खप होणार दुप्पट! 

बाटलीबंद पाण्याच्या मागणीत वृद्धी   वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचे अहवालातून स्पष्टीकरण

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशात शीतपेय बाजारात येणाऱया काळात वृद्धी होण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार 2021 पर्यंत शीतपेय वर्षाला प्रति व्यक्ती 84 बाटलीपर्यंत वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पेप्सिको इंडियाचे बॉटलिंग भागीदार वरुण बेव्हरेजेस लिमिटेड (वीबीएल) यांनी आपल्या अहवालातून स्पष्ट केले आहे.

2016 मध्ये एक व्यक्ती वर्षाला सुमारे 44 बाटल्या शीतपेय पित होता. यात 2021 पर्यंत वाढ होऊन 84 बाटल्यांवर पोहोचेल, अशी शक्यता या अहवालात सांगण्यात आली आहे. शीतपेय उद्योगातील सर्व श्रेणीत खासकरून ज्यूस आणि बाटलीबंद पाणी यामध्ये व्यापक वाढ होईल, असे वीबीएलने 2018 च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. ज्यूस आणि बाटलीतील पाणीसाठी मध्यम वर्गातील लोकांची वाढलेली मागणी, स्वस्त आणि शहरीकरणाच्या वाढीसह ग्रामीण विद्युतीकरणाचे घटक शीतपेय उद्योगाच्या वाढीसाठी महत्वपूर्ण ठरतील. कार्बोनेट्स ड्रिंकमध्ये कोला कार्बोनेट्सशिवाय विशेषतः लिंबू ज्युस सारखी पेय वाढण्याची शक्यता असल्याचे वीबीएलने म्हटले आहे. भारतात पेप्सिकोच्या विक्रीत कार्बोनेट्स पेयांची 51 टक्के हिस्सेदारी आहे.

लोकांमध्ये पाण्यापासून होण्याऱया आजारांबाबत जागृकता आणि शहरी भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्यामुळे बाटलीबंद पाण्याच्या मागणीत वाढ होण्याचे संकेत आहेत, असेही वीबीएलने अहवालातून स्पष्टीकरण दिले आहे. 

2016 मधील शीतपेयांचा खप…

भारतात 2016 मध्ये शीतपेयांचा प्रति व्यक्ती खप 44 बाटलीपर्यंत होता. हाच अमेरिकेसारख्या बाजाराच्या तुलनेत फारच कमी आहे. अमेरिकेत प्रति व्यक्ती 1496 बाटल्यांचा खप असून मॅक्सिकोमध्ये प्रति व्यक्ती 1489, जर्मनीत 1221 आणि ब्राझील सारख्या विकसीत देशात 537 प्रति व्यक्ती बाटल्यांचा खप आहे.