|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » वरवरा राव यांचा तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज

वरवरा राव यांचा तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज 

ऑनलाईन टीम / पुणे :

भावाच्या पत्नीच्या निधनानंतरच्या विधींसाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या विद्रोही कवी आणि लेखक वरवरा राव यांनी युएपीएच्या (बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली) विशेष न्यायालयात केला आहे. सध्या राव हे येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्या भावजयीचे सोमवारी निधन झालो. राव यांच्या मोठय़ा भावाचे यापूर्वीच निधन झाल्याने घरात वरवरा रावच मोठे आहेत. निधनानंतर 9 ते 12 दिवसापर्यंतच्या धार्मिक विधीसाठी घरातील मोठी व्यक्ती उपस्थित राहणे गरजेचे असल्याने त्यांनी विधींसाठी न्यायालयाकडे 29 एप्रिल ते 4 मे दरम्यान तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.