|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडे 4.50 लाखांची संपत्ती, चांदीचे ताट, ग्लास, पेला आणि कमंडलू

ऑनलाईन टीम / भोपाळ :

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रज्ञा ठाकूर यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे जवळपास साडेचार लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये चांदीचे ताट, ग्लास, पेला आणि कमंडलू यासह सोन्याची चेन आणि अंगठी त्यांच्याकडे असल्याची माहिती देण्यात आली आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडे चार लाख 44 हजार 224 रुपये इतकी संपत्ती आहे. त्यामध्ये 90 हजार रुपयांची रोकड आणि दोन बँक खात्यांमध्ये 88 हजार 824 आणि 11 हजार रुपये जमा आहेत. साध्वी यांचे कोणत्याही कंपनीत शेअर्स वगैरे नाहीत. तसेच त्यंच्याकडे गाडी किंवा जमीन नाही.

साध्वी यांच्याकडे 48 हजार रुपयांची एक सोन्याची चेन, 16 हजार रुपयांची अंगठी, 81 हजार रुपये किंमतीचे चांदीचे कमंडलू, तसेच चांदीची थाळी, चार चांदीचे ग्लास, एक चांदीचा पेला, पायातल्या चांदीच्या रिंग्स आणि श्रीरामाचे नाव लिहिलेली एक चांदीची प्लेट या सर्वांची किंमत मिळून 4 लाख 44 हजार 224 रुपये आहेत.