|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माढय़ाच्या गडासाठी आज जनता देणार कौल

माढय़ाच्या गडासाठी आज जनता देणार कौल 

प्रतिनिधी /  पंढरपूर 

राज्यामध्ये बहुचर्चित असणाऱया माढा लोकसभा मतदारसंघाच्या गडाचा गडकरी ठरवण्यासाठी आज मतदारांचा कौल ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. शरद पवारांमुळे चर्चेत आलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादींच्या अस्तित्वाची तर मुख्यमंत्र्यांच्या प्रभावामुळे भाजपाच्या प्रतिष्ठेची लढाई सध्या सुरू आहे. याच माढा मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा लढवण्याचे जाहीर केले, परत नंतर माघार घेतली. यानंतर राष्ट्रवादीचे विद्यमान खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश झाला. तद्नंतर भाजपाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांना माढय़ाच्या उमेदवारीची ऑफ्ढर मुख्यमंत्री फ्ढडणवीसांकडून आली. पण शिंदेनी करमाळयाच्या आमदारकीसाठी भाजपाचे खासदार होणे नाकारले. अशा परिस्थितीत रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माढय़ांची उमेदवारी मिळाली. तर मोहिते-पाटील भाजपात गेल्याने पवारांनी पॉवरनीती वापरून संजय शिंदेना स्वगृही घेऊन माढय़ाची उमेदवारी देऊ केली.

यासर्व घडलेल्या घडामोंडीमुळे माढा मतदारसंघ चर्चेत आला. यानंतर मुख्यमंत्री फ्ढडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी माढय़ासाठी चार-चार दौरे केले. येथील निवडणूक प्रतिष्ठेची केली. इतकेच काय तर माढा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी सभा घेतली. अशा स्थितीत माढय़ाचा गड कोण सर करणार. याची गावचावडीवर चर्चा आहे. याबाबत अनेकांच्या पैजा लागल्या आहेत. भूमिपुत्र म्हणून संजय शिंदेना पसंती मिळते आहे. तर राजकीय नेत्यांच्या ताकदीमुळे रणजितसिंह नाईक-निंबाळकरही शर्यतीत अग्रेसर आहेत.

अशा †िस्थतीत निश्चितच स्थानिक राजकीय नेत्याच्या प्राबल्यावर ही निवडणूक होणार की उमेदवारांचे कर्तृत्व पाहून या निवडणुकीकडे पाहिले जाणर. याकडे सध्या राज्याचे लक्ष लागले आहे. कारण माढय़ाची निवडणुकीवर सोलापूर जिह्याचे राजकारण आणि भाजपा व राष्ट्रवादींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.