|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निर्भयपणे मतदान करा,पोलीस आयुक्तांचे आवाहन

निर्भयपणे मतदान करा,पोलीस आयुक्तांचे आवाहन 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव शहर व तालुक्मयातील 893 मतदान केंद्रांवर लोकसभेसाठी मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी केले आहे.

सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांनी एक पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. बेळगाव शहर व तालुक्मयात बेळगाव दक्षिण, उत्तर व ग्रामीण विधानसभा मतदार संघाबरोबरच चिकोडी लोकसभा मतदार संघात जाडलेले यमकनमर्डी मतदार संघातील 101 मतदान केंदे आहेत. शहर व तालुक्मयातील एकूण मतदार केंद्रांची संख्या 893 इतकी आहे.

प्रत्येक मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर जास्तीची खबरदारी घेण्यात आली आहे. सुमारे 1500 पोलीस व अधिकाऱयांबरोबरच राज्य राखीव दलाच्या तीन, केंद्रीय राखीव दलाच्या दोन व केंद्र सशस्त्र दलाच्या दहा तुकडय़ा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी अत्यंत निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा. मतदान केंद्रांवर काही अडचणी असल्यास केंद्रावरील पोलीस अधिकारी किंवा शेक्टर पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधून आपल्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.