|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रामदुर्ग तालुक्मयात 247 मतदान केंदे

रामदुर्ग तालुक्मयात 247 मतदान केंदे 

वार्ताहर/ रामदुर्ग

   बेळगाव लोकसभा क्षेत्रामध्ये मंगळवार दि. 23 रोजी मतदान होत असल्याने निवडणूक कार्यासाठी कर्मचारी मतदानासाठी आवश्यक ते सर्व साहित्यासह तालुक्मयातील विविध मतदान केंद्रास रवाना झाले आहेत. तालुक्मयात 103029 पुरुष, 99741 महिला व 11 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 2 हजार 781 मतदार आहेत. तालुक्मयात एकूण 247 मतदान केंद्र असून त्यात 24 अतिसूक्ष्म, 15 सूक्ष्म व 208 सामान्य मतदान केंद्र आहेत.

  तालुक्मयात कमकेरी मतदान केंद्र 10 मध्ये पिंक मतदान केंद्रे स्थापण्यात आली आहेत. 9 मतदान केंद्रात वेबकॅमेरा, 20 मतदान केंद्रात व्हिडिओ कव्हरेज, निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी 17 सेक्टर अधिकारी, 2 गट फ्लाईंग स्कॉड, 4 चेकपोस्ट स्थापण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी 197 पोलीस, 167 होमगार्ड, 1 डीवायएसपी, 3 सीपीआय, 6 पीएसआय व एएसआयचे नियोजन करण्यात आले आहे.

 येथील इरम्मा यादवाड सरकारी कॉलेजमध्ये मस्टरिंग व डी-मस्टरिंग कार्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान करण्यात येत असून तालुक्मयात 20 शतायुषी मतदार असून त्यांना गौरवपूर्ण मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगासाठी प्रत्येक मतदान केंद्रात व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून तालुक्मयातील सर्व मतदारांनी न चुकता मतदान करण्याचे आवाहन साहाय्यक निवडणूक अधिकारी बी. सुरेश कुमार यांनी केली आहे.