|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » परिवहनच्या 379 बस निवडणूक सेवेत

परिवहनच्या 379 बस निवडणूक सेवेत 

प्रतिनिधी/ बेळगाव

निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आलेले पोलीस व निवडणूक अधिकारी यांची ये-जा करण्यासाठी वायव्य कर्नाटक परिवहन विभागाने 379 बस निवडणूक सेवेत रुजू केल्या आहेत. सोमवार दि. 22 पासून मंगळवार दि. 23 पर्यंत या बस सेवेत राहणार आहेत. यामुळे प्रवासाला निघणाऱया नागरिकांना बस मिळणे कठीण आहे, याची नोंद घेण्याची गरज आहे.

वायव्य परिवहनच्या चिकोडी आगारातून 55, निपाणी येथून 40, संकेश्वर येथून 63, गोकाक येथून 84, रायबाग येथून 45 तर अथणी येथून 82 बस सोडल्या जाणार आहेत. वेगवेगळय़ा मार्गांवर सेवा देणाऱया या बस निवडणुकीत व्यग्र राहणार असल्याने या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. याची नोंद घ्यावी, असे आवाहन वायव्य परिवहनतर्फे करण्यात आले आहे.