|Thursday, February 20, 2020
You are here: Home » उद्योग » भारत बनतोय जगातील सर्वात वेगवान ऑटोमोबाईल मार्केट

भारत बनतोय जगातील सर्वात वेगवान ऑटोमोबाईल मार्केट 

अल्टोची विक्रीत झेप : वाहन निर्मितीत भारताची झेप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागील वर्षांत भारताने जगातीक स्तरावर सर्वात वेगवान वाहनांची निर्मिती करण्यात मजल मारली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात फ्यूल प्राईस, इंटरेस्ट रेट आणि इन्शुरन्स दर यात वाढ करण्यात आल्याने देशात वाहनांच्या मागणीवर प्रभाव पडल्याचे पहावयास मिळाले आहे. तर दुसऱया बाजूला ऑटोमोबाईल उत्पादनात वाढ झालेली आहे. 2018मध्ये ग्लोबल आटॉमोबाईल उत्पादन एका दशकात प्रथमच 1.1 टक्क्यांनी घसरण होत 9,56,34,593 युनिटवर राहिले आहे.

भारतातील ऑटोमोबाईल उत्पादनात टॉपच्या 10 देशात सर्वांधिक वाढ झालेली आहे. (प्रवासी आणि व्यावसायिक वाहने) हा आकडा मागील वर्षात 8 टक्क्यांनी वाढत जात जवळपास 51.7 लाख युनिट्सवर राहिला आहे. तर ब्राझीलने दुसऱया क्रमांकावर 5.2 टक्के वाढीसह 28.7 लाख युनिट्स नोंदवला. तर चीनमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राचे उत्पादन 4.2 टक्क्यांनी घसरण होत 2.78 कोटी युनिटवर स्थिरावला आहे. आणि जपान अमेरिका यांचे ऑटो उत्पादन 1.1 टक्के आणि 0.4 टक्क्यांनी वाढले आहे.

मारुती अल्टोची विक्रीत झेप

मारुती सुझुकी इंडियाची वेगवान बाजारात प्रवेश करणाऱया अल्टोने 2018-19मध्ये सर्वाधिक प्रवासी वाहनांची विक्री झालेली आहे. तर पहिल्या दहा प्रवासी वहनात या कारचा समावेश झाल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिगच्या आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारताचे प्रवासी वाहनांचे उत्पादनात वाढ

भारताची प्रवासी वाहन उत्पादनात 2.8 टक्क्यांनी वाढत जात 40,64,774 युनिट आणि व्यावसायिक वाहनाच्या संख्येत 34 टक्क्यांनी वाढीसह 11,09,871 युनिटवर राहिली आहे. सध्याच्या व्यावसायकि  वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचे एक कारण असल्याचे मत एव्हेटम पार्टनर्सचे व्यवस्थापकीय संचालक जी रामाकृष्णन यांनी व्यक्त केले आहे. 

Related posts: