|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » जॅरीकडून अलेक्झांडर व्हेरेव्ह चकित

जॅरीकडून अलेक्झांडर व्हेरेव्ह चकित 

वृत्तसंस्था/ बार्सिलोना

बार्सिलोना ओपन टेनिस स्पर्धेत द्वितीय मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हला पराभवाचा धक्का बसला. मॅचपॉईंटचा लाभ उठवता न आल्याने त्याला 81 व्या मानांकित निकोलस जॅरीकडून पराभव स्वीकारावा लागला. तसेच तिसऱया मानांकित डॉमिनिक थिएमने सहज विजय मिळवित तिसरी फेरी गाठली.

चिलीच्या 23 वर्षीय जॅरीने व्हेरेव्हवर 3-6, 7-5, 7-6 (7-5) अशी मात करून तिसऱया फेरीत स्थान मिळविले. गेल्या सात सामन्यातील व्हेरेव्हचा हा पाचवा पराभव आहे. जॅरीचा हा या वर्षातील पाचवा विजय आहे. थिएमने अर्जेन्टिनाच्या थिएगो श्वार्ट्झमनचा 6-3, 6-3 असा पराभव केला तर दोनदा ही स्पर्धा जिंकलेल्या निशिकोरीने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचा 7-5, 6-2 असा पराभव केला. माँटे कालों स्पर्धा जिंकणारा फॅबिओ फॉगनिनीची पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत असून त्याची लढत स्पेनच्या निकोला कुहनशी होईल. कुहनने फेडरिको डेल्बोनिसवर 7-6 (7-3), 4-6, 6-2 अशी मात केली.

जॅन लेनार्ड स्ट्रफने तिसरी फेरी गाठताना दहाव्या मानांकित डेव्हिड गॉफिनचा 7-6 (7-3), 6-3, जॉम मुनारने फ्रान्सेस टायफोचा 6-4, 6-3 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. पहिल्या फेरीच्या सामन्यात डेव्हिड फेररने मिशा व्हेरेव्हाचा 6-3, 6-1, मॅलेक जॅझिरीने गुडो आंद्रेओझीचा 6-7 (3-7), 6-4, 6-2, अल्बर्ट रॅमोस व्हिनोलासने कॅमेरॉन नॉरीचा 6-2, 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.