|Tuesday, January 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव




अपूर्व शिस्त, ऐतिहासिक मोर्चा

इतिहास घडविला, रणरागिणींचीही मोलाची साथ, अतिशय शिस्तबद्ध अशा अभूतपूर्व मोर्चाचे दर्शन प्रतिनिधी/ बेळगाव लक्षावधी मराठी जनांच्या उपस्थितीत गुरुवारी बेळगावात अभूतपूर्व असा इतिहास घडला आहे. रणरणत्या उन्हाची तमाही न बाळगता सहभागी झालेल्या लक्षावधी मराठी जनांच्या महापुराने सकल मराठी आणि मराठा क्रांतीची ज्योत चेतवली. आजवरच्या 62 व्या मोर्चाने प्रथमच कमालीच्या काटेकोर शिस्तीचे दर्शन घडविले. ‘बेळगाव महाराष्ट्राचेच!’ हे दाखवून देत नवा इतिहास ...Full Article

उचगाव-कोवाडमधून उत्स्फूर्त प्रतिसाद

वार्ताहर / उचगाव उचगाव, तुर्केवाडी, कोवाड भागातून मराठी भाषिक हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे क्रांती मोर्चात सहभागी झाले. भगव्या टोप्या व टी-शर्ट परिधान केलेल्या नागरिकांसह मोर्चात महिला सहभागी होण्यासाठी बेळगाव शहराकडे ...Full Article

राजहंसगड परिसरातून मोठा सहभाग

वार्ताहर / राजहंसगड राजहंसगड-देसूर परिसरातील नागरिकांनी आपली सर्व कामे बंद ठेऊन मराठा क्रांती मोर्चात भाग घेतला. मोर्चात सहभागी होण्यासाठी तरुण वर्गही पूर्णतयारीनिशी उतरला होता. आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनाना ...Full Article

क्रांती मोर्चात निपाणीकरांचा हुंकार

वार्ताहर/ निपाणी सकल मराठा आणि मराठी भाषिक क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून सीमाप्रश्न तसेच अनेक मागण्यांचा हुंकार घालण्यासाठी बेळगाव येथील क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी सकल मराठा बांधव निपाणीतून गुरुवारी सकाळी ...Full Article

युवतींनी दिले जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव मोर्चा यशस्वी झाल्यानंतर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांतर्फे जिल्हाधिकारी एन. जयराम यांना निवेदन देण्यात आले. सीमाप्रश्नाची सोडवणूक करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी युवतींनी जिल्हाधिकाऱयांना देत सर्वप्रकारच्या ...Full Article

विविध संघटनांतर्फे आल्पोपाहाराची सोय

बेळगाव / प्रतिनिधी मराठा क्रांती मूक मोर्चानिमित्त विविध संघ-संघटना व मंडळांतर्फे अल्पोपाहार व पाण्याचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक श्रीगणेश उत्सव मंडळ, बिच्चू गल्ली गाडेमार्ग, शहापूरतर्फे पुलाव वाटप, ...Full Article

टी-शर्ट विक्री करणाऱया तरुणाचा जामीन अर्ज फेटाळला

प्रतिनिधी / बेळगाव मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचे असा उल्लेख असलेल्या टी-शर्टची विक्री करणाऱया तरुणाच्या जामीन अर्जावर सरकारी वकिलांनी बुधवारी आपला युक्तिवाद केला होता. मात्र न्यायालयाने हा खटला आपल्या अखत्यारित ...Full Article

वैद्यकीय पथकांची मोलाची साथ

प्रतिनिधी/ बेळगाव अफाट जनसमुदाय मराठा क्रांती मोर्चात सामील होता. यावेळी कोणालाही आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास लगेचच तात्काळ उपचार मिळावेत, या अनुषंगाने मोर्चाच्या मार्गात ठिकठिकाणी रुग्णवाहिका व डॉक्टरांची पथके तैनात ...Full Article

मोर्चात सेल्फीची क्रेझ

प्रतिनिधी / बेळगाव मोर्चामध्ये सहभागी होणारे अनेक युवक, युवती या मराठा मोर्चाच्या इतिहासाची साक्ष होण्यासाठी सेल्फीचा वापर करत होते. सध्या सर्वत्र सेल्फीची क्रेझ सुरू आहे. सेल्फी घेणे हा आता ...Full Article

ट्रक-मोटारसायकल अपघातात युवक ठार

उगार खुर्द/वार्ताहर शिरगुप्पी-मांजरी रस्त्यावरील खोतवाडी येथे ट्रक-मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात युवक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात बुधवार दि. 15 राजी रात्री घडला. प्रविण मनोहर ...Full Article
Page 401 of 459« First...102030...399400401402403...410420430...Last »