|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवादुर्धर आजारग्रस्त बालिकेला अजूनही मदतीची गरज

प्रतिनिधी/ पेडणे पेडणे तालुक्यातील तुये येथील नऊ वर्षीय बालिका संस्कृती कांबळे हिला दुर्धर आजाराने ग्रासले आहे. सध्या तिच्यावर जुने गोवे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घरी नेले आहे. या खासगी हॉस्पिटलचे लाखो रुपये झालेले बिल अनेकांच्या मदतीने फेडले आहे. परंतु अजूनही तिला उपचाराची गरज असून यासाठी लाखो रुपये खर्च होणार आहे. यासाठी सदर बालिकेचे वडील सुधाकर कांबळे यांनी आर्थिक ...Full Article

अन् ऍम्बुलन्समध्ये तिने दिला बाळाला जन्म

प्रतिनिधी/ मडगाव बाळाचा जन्म हा प्रत्येक स्त्रीला हा आनंदाचा क्षण असतो. पूर्वी स्त्रीचे बाळंतपण घरीच केले जायचे. आज ते दिवस राहिलेले नाहीत. आत्ता बाळंतपण हॉस्पिटलमध्ये केले जाते. हॉस्पिटलमधील बाळंतपण ...Full Article

काँग्रेसमध्ये राष्ट्रवाद, लोकशाही शिल्लक नाही

प्रतिनिधी/ पणजी काँग्रेसने देशात आणिबाणी लादून लोकशाहीचा 1975 मध्ये खूनच केला होता. घराणेशाही आणि लोकशाही एकत्र राहून देश पुढे जाऊ शकत नाही. काँग्रेसमधून राष्ट्रवाद केव्हाच संपुष्टात आला असून त्या ...Full Article

जुने गोवे जेटीचे 16 कोटी पाण्यात

प्रतिनिधी/ पणजी राज्य साधन-सुविधा विकास महामंडळामार्फत जुने गोवे येथे बांधण्यात आलेल्या फ्लोटिंग जेटीची दुर्दशा झाली असून  16 कोटी रुपये पाण्यात गेल्यात जमा आहे. अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत दुर्दशा झाली ...Full Article

प्रतिनिधी/ म्हापसा कळंगूटमध्ये वेश्या व्यवसाय, अमलीपदार्थात वाढ का झाली हे सर्वांना माहीत आहे. कळंगूटमध्ये आमदार मायकल लोबो काय करतात हेही सर्वांना माहीत आहे. त्यांच्याबाबत आपल्याकडेही तक्रारी येतात. म्हणून मी त्या पसरवायच्या का? कळंगूटमध्ये लोबो यांनी असा कोणता उजेड घातला आहे की त्यांना उचलून धरायला पाहिजे. तसे असेल तर 40 ही मतदारसंघाचा आमदार लोबो यानाच करायला हवे, असा टोला नगरविकासमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी लावला आहे. म्हापसा येथे काल सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की गेल्या 25 वर्षात आपण म्हापशात केलेला विकास अन्य कुणीच आमदाराने केलेला नाही. मला माझ्या विकासकामाची प्रसिद्धी करण्यास आवडत नाही. जे पोलीस अधिकारी ड्रग्स माफियांशी गुंतलेले आहेत त्यांची नावे उघड करणार, असे प्रसार माध्यमांतून खुलेआम आवाज उठविणारे लोबो आज तोंड दाबून गप्प का? असा सवाल नगरविकासमंत्र्यांनी केला आहे. म्हापसा भाजप मंडळ समवेत नगरविकासमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपसभापती मायकल लोबो यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. लोबो यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी आपली कोणतीही चूक नसताना लोबो यांनी एका खासगी कार्यक्रमात आपल्यावर नाहक आरोप केले आहेत. त्यामुळे आपण संतप्त झालो आहे. याबाबत आपण पक्ष सचिवांशी तक्रार केली आहे. मात्र तेथेही आपणास दाद मिळत नाही. मायकल लोबोवर कारवाई झालीच पाहिजे, असे लेखी पत्रही आपण पक्षाला पाठविले आहे, असे डिसोझा म्हणाले. नावे उघड करा, बेकायदेशीर धंदे कायमचे बंद पाडू आज आमचेच सरकार सत्तेवर आहे. उपसभापती आता ड्रग्स माफियांशी संबंध असलेल्या पोलीस अधिकाऱयांची नावे का उघड करीत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. आम्हालाही ड्रग्स राज्यात नको आहे. लोबो यांनी प्रसारमाध्यमातून हे उघड केले असले तरी पोलिसांनी लोबो यांची जबानी याबाबत का घेतली नाही. लोबो यांना खरोखरच मनातून राज्यातून आणि खास करून कळंगूट मतदारसंघातून अमलीपदार्थ व्यवहार बंद करायचा असेल तर त्यांनी त्या पोलीस अधिकाऱयांची नावे उघड करावीत. आपणही त्यांना पाठिंबा देतो. सर्व बेकायदेशीर गोष्टी बंद पाडूया. कळंगूटचे रस्ते, समुद्र, क्लब, अमलीपदार्थ, वेश्या व्यवसाय याकडे लोबोंनी लक्ष केंद्रीत करावे, असे मंत्री डिसोझा म्हणाले. लोबो विरोधी तक्रारींकडे सरकारचे दुर्लक्ष वॉल्टर लोबो नामक इसम मायकल लोबो विरोधात खुलेआम धमक्या देत आहे. यु टय़ुब, हॉटसऍपवर लोबो यांची बदनामी चालली आहे. याकडे त्यांनी प्रथम लक्ष द्यावे. माझ्याकडे लोबोंबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्या पक्षाकडे पाठविल्या तर त्यावर पुढे काहीच होणार नाही. आपण अनेक अशा तक्रारी दिल्या आहेत. मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मंत्री डिसोझा यांनी सांगितले. दिगंबर कामत यांच्या काळातही जास्त विकास आज आपल्याजवळ 20 नगरसेवक आहेत. सुमारे 28 हजार मतदार बांधव आहेत. ते आपणास निवडून देतात. 10 हजार मतदार आपल्या विरोधात आहेत. म्हणजे साहजिकच ते नकारात्मक बोलणारच म्हणून म्हापशाचा विकास साधला नाही, असे बोलणे लोबोंचे चुकीचे होणार आहे. दिगंबर कामत मुख्यमंत्री असतानाही म्हापशात सर्वात जास्त विकास झाला आहे, असे मंत्री डिसोझा म्हणाले. लमाणी लोकांना खोटी आश्वासने देणे थांबवावे मायकल लोबो लमाणी लोकांना शेडय़ुल ट्राईब करू पहात आहे. ते इतके सोपे नाही. आपले त्यांना आव्हान आहे, त्यांनी ते करून दाखवावे. लोबो ते करू शकत नाही. त्यासाठी घटना लागते. जे अनपड आहेत त्यांना लोबो खोटी माहिती देऊन आपल्याजवळ ठेवू पाहत आहेत. लोबो यांनी लमाणी लोकांना नाहक खोटी आश्वासने देऊ नये, असे ते म्हणाले. .. तर लोबोंना योग्यवेळी धडा शिकवू मुख्यमंत्री आजारी पडल्याने काही विकासकामे धिम्यागतीने झाली. त्याचे खापर लोबोंनी माझ्या माथी फोडू नये. लोबोंना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. ते माझ्या विरोधात कुटील डाव करू पाहतात. त्यांना योग्यवेळी धडा शिकवू. असा इशारा त्यांनी दिला. लोबो म्हापशाचे नगरसेवक फोडू पाहतात काय असा पत्रकारांनी प्रश्न केला असता, त्याचा आपल्यास काही फरक पडत नाही. शेवटी हे राजकारण आहे, लोबोंचे आरोप अर्थहिन : लांजेकर आम्ही 17 नगरसेवक एकसंघ आहोत. मायकल लोबो यानी नगरविकासमंत्र्यांवर केलेल्या आरोपांना काही अर्थ नाही. आमचे मंत्री म्हापशाचा विकास साधण्यास समर्थ आहेत. लोबोंना म्हापशाचे पाणी यंदाच दिसले काय? जलस्रोत खात्याच्या तांत्रिक चुकीचे खापर मंत्र्यांच्या डोक्यावर का? म्हापशात 25 टन कचरा गोळा केला जातो. येत्या 27 रोजी होणाऱया भाजपच्या बैठकीत आम्ही लोबोंविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत, असे म्हापसा भाजप मंडळ अध्यक्ष दामोदर लांजेकर यांनी सांगितले. 20 वर्षापासून म्हापशाचा चौफेर विकास : फळारी लोबो यांनी गरजेशिवाय वाद निर्माण केला आहे. राज्यातील लोक बाबुशकडे एक वरिष्ठ व सरळ नेता म्हणून पाहत आहेत. 20 वर्षापासून म्हापशाचा चौफेर विकास झाला आहे. मंत्री डिसोझा लोकशाही पद्धतीने काम करीत आहेत. नागरिकांनी त्यांना उचलून धरले आहे. निवडणुकीत त्यांना सभाही घेण्याची गरज पडत नाही. लोबो यांनी भाजपच्या तीन जागा पाडल्या त्यापेक्षा त्यांनी भाजप 13 वरून 21 कसे होणार याकडे लक्ष द्यावे, असे जीसुडाचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक संदीप फळारी म्हणाले. विकासाबाबत लोबोंची विधाने खटकणारी : कांदोळकर माझी कामे होण्यासाठी मी सर्वांकडे जातो. आपण सर्व आमदारांना सारखाच आहे. म्हापशात आजवर आम्ही खूप विकास साधला आहे. आम्ही आणि काय करणार, विकासाबाबत लोबोंची विधाने खटकणारी आहेत, असे सुधीर कांदोळकर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. नगरसेवक रायन ब्रागांझा यांनी म्हापशात मोठय़ाप्रमाणात विकास केल्याचे सांगितले.

प्रतिनिधी/ म्हापसा कळंगूटमध्ये वेश्या व्यवसाय, अमलीपदार्थात वाढ का झाली हे सर्वांना माहीत आहे. कळंगूटमध्ये आमदार मायकल लोबो काय करतात हेही सर्वांना माहीत आहे. त्यांच्याबाबत आपल्याकडेही तक्रारी येतात. म्हणून मी ...Full Article

दरड कोसळल्याने गोवा-बेळगाव महामार्ग बंद

केरिया खांडेपार येथील घटना ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर प्रतिनिधी/ फोंडा केरिया-खांडेपार येथे गोवा-बेळगाव महामार्गावर काल सोमवारी दोनवेळा दरड कोसळल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून वाहतुकीसाठी हा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला ...Full Article

विधानसभा अधिवेशन 18 दिवसांचे करा

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांची मागणी प्रतिनिधी/ पणजी विधानसभेच्या येत्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज किमान 18 दिवसांचे करावे अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षाने केली असून ते आता वाढवावे असे सूचविले ...Full Article

व्यवहारामध्ये ग्राहकांनी जागरुक राहणे गरजेचे

प्रतिनिधी/ पणजी  सध्या व्यावहारामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार तसेच फसवणूक केली जात आहे. यासाठी ग्राहकांनी सदैव जागरुक राहीले पाहिजे. यासाठी सरकारतर्फे जागरुकता केली जात आहे. आता पथनाटय़ामार्फत ही जागृती करण्याचा ...Full Article

सत्तरीतील धबधब्यावर शनिवारपासून सरकारी यंत्रणेची करडी नजर

उदय सावंत/ वाळपई सत्तरीतील पावसाळय़ात निसर्ग पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱया पर्यटकांवर सरकारची संबंधित यंत्रणा करडी नजर ठेवणार असून त्याची कारवाई आजपासून सुरू होणार आहे. यासाठी वाळपई पोलीस, वाळपई अबकारी ...Full Article

‘गोवा पर्यावरण चित्रपट महोत्सवास 2018’ साठी नोंदणीला सुरुवात

प्रतिनिधी/ पणजी पर्यावरणाचे महत्व आता प्रत्येकाला कळू लागले आहे आणि याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे तसेच त्याची जोपासना करणे हे महत्वाचे असून ते कळले पाहिजे. या हेतूने यावर्षी ...Full Article
Page 21 of 511« First...10...1920212223...304050...Last »