|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

कोळसा भट्टीवर धाड, 535 पोती जप्त!

मोरवणेत जंगलात वनविभागाची कारवाई, प्रतिनिधी/ चिपळूण    न्यायालयाच्या बंदी आदेशानंतरही मोरवणे येथील जंगलात कोळसा भट्टय़ा धगधगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मिळालेल्या तक्रारीनंतर वनविभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 535 पोती कोळसा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वनविभागाच्या सुस्तावलेल्या कारभारामुळे दोन वर्षानंतर पुन्हा दसपटी भागात पुन्हा कोळसा व्यावसायिकांनी साम्राज्य सुरू केल्याचे उघड झाले आहे. ...Full Article

‘नाणार’ला पर्याय गुहागर, रोह्याचा?

रत्नागिरी/ प्रतिनिधी शिवसेनेच्या आग्रहामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार तेल शुध्दीकरण कारखान्याची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रातच होण्यासाठी राज्य सरकार आग्रही असून गुहागर व ...Full Article

महामार्ग चौपदरीकरण खड्डय़ात

प्रतिनिधी/ चिपळूण चौपदरीकरण सुरू असलेल्या महामार्गाचा शुभारंभ होण्यापुर्वीच त्यावर खड्डे पडल्याने कामाच्या दर्जासमोरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खेड टप्प्प्यातील लवेलजवळ रस्ता कामातील कांक्रीटच उडून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ...Full Article

कोकण विकासाला मिळाला ‘हिरवा कंदील’!

ऍड. विलास पाटणे / रत्नागिरी कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोणाऱया वैभववाडी – कोल्हापूर या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्यामुळे कोकणच्या विकासालाच हिरवा कंदील मिळाला आहे. दोन्ही विभाग जोडले गेल्याने व्यापार, ...Full Article

पाकीस्तानवरील हल्ल्यानंतर जिल्हय़ात जल्लोष

प्रतिनिधी / रत्नागिरी : काश्मिरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय वायुसेनेने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे सर्वच देशवासीयांचा उर अभिमानाने भरून आला आहे.  रत्नागिरी जिल्हय़ात या कारवाईचे सर्वत्र जल्लोषी स्वागत करण्यात आले. ...Full Article

सरकारला अंबानी, अदानीची जास्त पर्वा !

प्रतिनिधी /  रत्नागिरी     आजपर्यंत कोणत्याही सरकारने प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न गांभिर्याने हाताळलेला नाही.   प्रकल्पग्रस्तांपेक्षा सरकारला अंबानी, अदानी अशा बडय़ा उद्योजकांचीच अधिक  पर्वा आहे. त्यामुळेच प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाकडे डोळेझाक केली जात असल्याचा ...Full Article

घाटविलकरच्या मारेकऱयाला जन्मठेप

प्रतिनिधी  /रत्नागिरी : तालुक्यातील सोमेश्वर बौद्धवाडी येथील ठेकेदार सुहास घाटविलकर याचा कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी आरोपी परिमल मुकुंद पवार (27, ऱा सोमेश्वर बौद्धवाडी) याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. ...Full Article

मुख्यमंत्र्यांची आश्वसाने म्हणजे लबाडा घरचे आवताण : शरद पवार

ऑनलाईन टीम / रत्नागिरी  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे, वागणे हे लबाडा घरचे आवताण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. रत्नागिरीत काल (24 फेब्रुवारी) ...Full Article

खेडमध्ये चोरटय़ांचा उच्छाद कायम

प्रतिनिधी /खेड : पंधरा दिवसांपूर्वीच चोरटय़ांनी स्वरूपनगर येथे तीन फ्लॅट फोडून धुडगूस घातल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटेच्या सुमारास किराणा मालाच्या दुकानासह एक मेडिकल दुकान फोडून 50 हजार रूपयांची ...Full Article

प्राणीमात्रांवरच जगाचे अस्तित्व अवलंबून

प्रतिनिधी /चिपळूण : काहीही तयार न करणारा माणूस या जगाचा मीच मालक असल्याचे समजतो. मात्र त्याच्या हातात काहीही नसून ज्यादिवशी गायी, मधमाशा व फुलपाखरू या जीवनचक्रातून गायब होतील त्यानंतर ...Full Article
Page 20 of 221« First...10...1819202122...304050...Last »