|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गदोडामार्ग नगरसेविका संध्या प्रसादी अपात्र

कणकवली : कसई-दोडामार्ग नगर पंचायतीतील शिवसेनेच्या नगरसेविका संध्या राजेश प्रसादी यांना जिल्हाधिकाऱयांनी उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरविले आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचे (व्हीप) उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते संतोष विश्राम म्हावळणकर यांनी सौ. प्रसादी यांना अपात्र करण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे केली होती. म्हावळणकर यांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी बाजू मांडली. ऑक्टोबर 2015 मध्ये कसई-दोडामार्ग नगर पंचायत निवडणुकीत 17 ...Full Article

वैभववाडी नगराध्यक्षपदी संजय चव्हाण

वैभववाडी : वाभवे- वैभववाडी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी संजय चव्हाण, तर उपनगराध्यक्षपदी संपदा राणे यांची निवड करण्यात आली. संपदा राणे या वाभवे-वैभववाडी नगर पंचायतीच्या पहिल्या महिला उपनगराध्यक्ष ठरल्या. वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीची ...Full Article

प्रधानमंत्री आवास लाभार्थी होणार ‘ऑनलाईन’

कणकवली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रस्ताव स्वीकारण्यास तालुकापातळीवरून सुरुवात करण्यात आली असताना आता पूर्वीची पद्धत इतिहासजमा करीत प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांचे प्रस्ताव ऑनलाईन भरण्यात येत आहेत. एवढेच नाही, तर ऑनलाईन ...Full Article

कोळंब पूल अधिकच धोकादायक?

मालवण : कोळंब पुलाच्या तळाखालील भाग अधिकच कमकुवत बनल्याने गुरुवारी कोळंब व सर्जेकोट येथील ग्रामस्थांनी पाहणी केली. यावेळी पुलाचे स्टील आणि खांबांकडील स्टील अनेक ठिकाणी सडलेले दिसले. खाडीपात्रातील खांब आणि ...Full Article

भारतीय ‘रेक्टय़ॅक्युलेटेड पायथन’ जगातील सर्वात मोठा साप

सिंधुदुर्ग : जगातील सरपटणाऱया प्राण्यांपैकी सर्वात मोठय़ा समजल्या जाणाऱया ‘ऍनाकोंडा’ या सापाला मागे टाकत भारतातील ‘रेक्टय़ॅक्युलेटेड पायथन’ जातीचा अजगर हा जगातील सर्वात मोठा साप ठरला आहे. अंदमान-निकोबारमधील बेटे, नागालँड, मिझोराम, ...Full Article

गोंधळ, शाईफेकीनंतरही ‘हे राम..’ सुरळीतगोंधळ, शाईफेकीनंतरही ‘हे राम..’ सुरळीत

कणकवली : काँग्रेसचा विरोध आणि शिवसेनेचे समर्थन अशा तणावाच्या वातावरणात ऐनवेळी बदललेल्या हॉलमध्ये कणकवलीत बुधवारी रात्री ‘हे राम.. नथुराम’ नाटक पार पडले. हॉलबाहेर व आतमध्येही कमालीचा पोलीस बंदोबस्त तैनात होता. ...Full Article

रिक्षा चालकांची एकजूट, भव्य मोर्चा

सिंधुदुर्गनगरी : प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी एक दिवसाचा बंद पाळत जिल्हय़ातील रिक्षा चालक, मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. ‘आमदारांना पेन्शन, आम्हाला टेन्शन’, ‘खासदारांना पेन्शन, आम्हाला टेन्शन’ अशा घोषणा देत रिक्षा ...Full Article

एसटीच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवार नियुक्तीच्या ‘प्रतीक्षेत’च

कणकवली : एसटी महामंडळाकडून 2015 मध्ये करण्यात आलेल्या चालक (कनिष्ठ) पदाच्या भरतीत प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आलेल्या जिल्हय़ातील 20 उमेदवारांना आतापर्यंत नियुक्तीची प्रतीक्षाच राहिली आहे. आता नव्याने जाहीर केलेल्या भरतीत सर्वसाधारण ...Full Article

साहित्य अकादमीतर्फे 15 रोजी चर्चासत्र

सावंतवाडी : गेल्या पंचवीस वर्षातील मराठी साहित्याचा वेध घेऊन त्यात व्यक्त झालेल्या प्रयोगशील जाणिवांचे मूल्यमापन करण्यासाठी साहित्य अकादमीने सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग साहित्य संघ, श्रीराम वाचन मंदिर, बांदा गोगटे-वाळके महाविद्यालय यांच्या ...Full Article

आनंदवाडी प्रकल्प केंद्राच्या मंजुरीनंतरच मार्गी

देवगड : आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या प्रकल्पासाठी आता पर्यावरण दाखल्याची आवश्यकता नसल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र केंद्र सरकारकडे रवाना करण्यात आले आहे. लवकरच ...Full Article
Page 331 of 338« First...102030...329330331332333...Last »