बेंगळूर लोकायुक्तांकडून कर्मचाऱयांची झाडाझडती
प्रतिनिधी / जोयडा
आखेती (ता. जोयडा) ग्रामपंचायतीत विकासकामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे जनतेच्या तक्रारीवरून लोकायुक्त बेंगळूर यांच्याकडून तपासणी व विचारणा करण्यास प्रारंभ झाला आहे.
लोकायुक्त बेंगळूर एस. पी. व त्यांच्या अधिकाऱयांनी रामनगर पोलीस ठाण्यात आखेती ग्रा. पं. चे कर्मचारी राहुल यांची दोन दिवस कसून चौकशी केली. अखेर सदर कर्मचाऱयांची चांगलीच झाडाझडती घेतल्यानंतर व काही कामाचे बील भावाचा व पत्नीच्या नावावर बोलू लागला. यावेळी मनरेगाची कामे करून बील काढल्याचे लोकायुक्त समोर कबुल केले. याची नोंद रितसर करून घेतली आहे.
या कर्मचाऱयांवर बंधारा बांधणे, मनरेगा, 14 व्या वित्त आयोगांतर्गत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. एस. सी. व एस. टी. अनुदानामध्ये अपहार झाल्याचे शिवाय ग्रा. पं. अभिवृद्धी निधीतही त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. याची चौकशी करून जोयडा ई. ओ. व जिल्हा पंचायत अधिकारी यांच्यासमोर सहा महिन्यांपूर्वी आखेती, अनमोड, मेढा, रंगारुक, वरलेवाडी व तिनईघाट नागरिकांनी व सत्तारुढ पक्षाच्या पदाधिकाऱयांनी पुराव्यासह तक्रार केली आहे.
त्यामुळे लोकायुक्त एस. पी. यांनी तपास सुरू केला आहे. तत्कालिन अध्यक्ष, उपाध्यक्ष व माजी ग्रा. पं. सदस्य यांचीही चौकशी होणार आहे. त्यावेळी तक्रार केलेले नागरिक व जनप्रतिनिधी आता ग्रा. पं. सदस्य बनले आहेत. लवकरच ग्रा. पं. सभेत यावर निर्णय होणार आहे, असे नवनिर्वाचित सदस्यांनी बोलताना सांगितले.