ऑनलाईन टीम / बगदाद :
इराकमधील अमेरिकी लष्कराच्या हवाईतळावर इराणने 12 क्षेपणास्त्र डागली आहेत. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
इरबिल, अल हसद आणि ताजी बेस या अमेरिकी हवाईतळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. त्यानंतर अमेरिका आणि इराणमधील युद्धाचे ढग अधिकच गडद झाले असून, दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.
इराणचा मेजर जनरल कासिम सुलेमानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने हा हल्ला चढविला आहे. अमेरिकेतून आखाती देशात जाणाऱया सर्व विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत.
इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांना लक्ष्य केले होते. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अमेरिकी अधिकाऱयांनी दिली आहे. तर इराणने या हल्ल्यात अमेरिकेचे 30 जवान मारले गेल्याचा दावा केला आहे.