प्रतिनिधी / शिरोळ
मन मनगट आणि मेंदू सक्षम राखायचे असेल तर योगा शिवाय पर्याय नाही सध्याच्या कोरोना महामारी संकटात सदृश्य चित्रपटाची गरज आहे योगामुळे ते शक्य होईल व बलशाली भारत घडविण्यासाठी बलवान पिढी तयार होईल असा विश्वास श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उद्यान पंडीत गणपतराव पाटील यांनी व्यक्त केला.
येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात योगा दिनानिमित्त रविवारी सकाळी सात वाजता कुटवाड येथील विवेक पाटील या तरुणाने अवघ्या तीन तास चाळीस मिनिटांमध्ये 1008 सूर्यनमस्कार घालून आपले नैपुण्य व कौशल्य दाखविले योगा दिनाचे औचित्य साधून आप्पासाहेब सा रे पाटील फाउंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले की योगाचा प्रचार व प्रसार व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी येत्या दिवाळीनंतर योग शिबीर व स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले. प्रारंभी स्वर्गीय आप्पासाहेब सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेचीन हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली
या कार्यक्रमास नगराध्यक्ष अमरसिंह पाटील गटशिक्षणाधिकारी दिपक कामत अवधूत पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक यावी पाटील शेखर पाटील सर्जेराव पवार जि प सदस्य प्रवीण माने दामोदर सुतार देवाचे तो पिसा अशोक निर्मळे अशोक शिंदे नवनाथ पुजारी अशोक कोळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .