एका दिवसात 179 गुन्ह्यांची नोंद; 60 आरोपींना अटक
ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील लॉकडाऊनमध्ये अवैध्य मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून काल एका दिवसात 179 गुन्ह्यांची नोंद केली आहे. या प्रकरणी 60 जणांना अटक करण्यात आली असून, 39.66 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लॉकडाऊनमध्ये अवैध मद्य निर्मिती, विक्री करणाऱ्यांविरुद्ध उत्पादन शुल्क विभागाने कारवाई सुरू केली आहे. 24 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत राज्यात 1752 गुन्हे नोंदविण्यात आले असून 657 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 63 वाहने जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण 4.26 कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.