मैत्रिणींनो, आपल्याला जुन्या सवयी सोडून नव्या सवयी अंगिकारायच्या असतात. मात्र एकदा सवय लागली की ती सुटायला वेळ लागतो. बरेच जण नव्या वर्षात संकल्प करतात. जुन्या गोष्टींना तिलांजली देत काहीतरी नवं करायचं ठरवतात. पण नव्या सवयी काही लागत नाहीत. सगळं तसंच सुरू राहतं आणि मग संकल्प मागे पडतो. मात्र चांगल्या सवयींचा अंगिकार करण्यासाठी अगदी छोटे बदल करता येतील आणि मग सगळं कसं अगदी सहज जमून जाईल. हे बदल कोणते? जाणून घेऊ
- बहुसंख्य लोक नव्या वर्षात व्यायामाचा संकल्प सोडतात. दोन-चार दिवस उत्साह असतो. पण नंतर व्यायाम बारगळतो. कधी उठायला उशीर होतो तर कधी इतर कामं असतात. तुम्हीही व्यायामाचा संकल्प सोडला असेल तर रात्री व्यायामाचे कपडे घालूनच झोपा. मोजे आणि बूट पलंगाखाली ठेवा. यामुळे आळस बाजूला सारून तुम्ही व्यायाम करू शकाल.
- * घराबाहेर पडताना आपण चावी, मास्क विसरतो. मग खाली उतरल्यावर परत वर यावं लागतं. हे टाळण्याठी दरवाज्यालगत हुक किंवा शेल्फ बसवून घ्या. मास्क, चाव्या, पर्स अशा वस्तू इथे अडकवून ठेवता येतील.
- * बाहेर पडताना जवळ अतिरिक्त मास्क ठेवा. तुम्ही लावलेलं मास्क हरवलं किंवा पडलं तर दुसरं मास्क कामी येऊ शकेल.
- * सकाळी दात घासतानाही मेडिटेशन करता येईल. दात घासता घासता एका पायावर उभे रहा. यामुळे शरीराचं संतुलन राखलं जाईल. काही सेकंदांनंतर दुसर्या पायावर उभे रहा. यामुळे मनःशांती लाभू शकेल.
- * फ्रीज नियमित स्वच्छ करा. तसंच सगळ्या वस्तू नीट मांडून ठेवा. गरजेपुरत्या वस्तूच फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे स्वयंपाक करताना प्रत्येक वस्तू वेळेवर मिळाल्याने तुमची चिडचिड होणार नाही.
- * झोपण्याआधी डायरी लिहिण्याची सवय लावून घ्या. दिवसभरातल्या घडामोडी कागदावर उतरवा. तुमच्या मनातलं लिहून ठेवा. यामुळेही खूप बरं वाटेल.