डिचोली/प्रतिनिधी
खाण कंपनीला वर आणण्यासाठी आम्हीही जिवाचे रान करून घाम गाळला आहे. कंपनी अधिकाऱयांपेक्षा हि कंपनीला यश मिळवून देण्यात कामगारांचेही मोठे योगदान आहे. असे असतानाही आज कंपनी बंद असल्याचे कारण देत कंपनी आम्हला अर्धाच पगार देत आहे. याउलट मात्र कंपनी अधिकाऱयांना पूर्ण पगार व इतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. आज या कामाच्या हिंमतीवर आम्ही मोठय़ा प्रमाणात बँ?कांमधून कर्जे काढलेली आहेत. सध्या येणारा पगार हा हि कर्जे फेडण्यातच संपतो आणि संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसाच हातात राहत नाही. या परिस्थितीत आमची जगण्याची स्थिती गंभीर बनली आहे, अशी व्यथा सेसा खाण कामगारांनी सभापती तथा डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांच्यासमोर मांडली.
डिचोलीत सेसा खाण कंपनीवर कामाला असलेल्या कामगारांनी सभापती राजेश पाटणेकर यांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. दरम्यान याप्रकरणी सभापती पाटणेकर यांनी आपण हा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून नंतर कामगारांसह लवकरच त्यांची भेट घडवून आणणार असे आश्वासन दिले.
खाणी बंद पडल्याचे कारण देत सेसा कंपनीने खर्च कपातीच्या नावावर केवळ कामगारांवरच अन्याय चालविला आहे. अर्धा पगार देताना वाहतूक इणि अन्य सुविधाही बंद केल्या आहेत. अधिकारी वर्गाला पूर्ण पगार देताना कामगारांवर मात्र उपासमारीची पाळी आणली आहे. या अन्यायपुढे आमचे जगणे कठीण झाले असून सरकारने यात हस्तक्षेप करावा आणि आम्हालाही पूर्ण पगार द्यावा. या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कामगारांचे जगणे मुश्कलीचे बनले आहे. मोठी आर्थिक समस्या उदभवली असताना कंपनीकडून आम्हाला येणे असलेली थकबाकीही कंपनीने दिलेली नाही. खाणींचे भवितव्य अधांतरी असले तरी खाणी सुरू करण्यासाठी सरकारचे सकारात्मक प्रयत्न सुरूच आहे. हि एक समाधानाची बाब असून एकदा कधी खाणी सुरू होतात आणि आमची समस्या कायमची मिटते, याची प्रतिक्षा आम्हला लागून राहिली आहे. असे कामगारां?नी सभापतींसमोर बोलताना सांगितले.
खाणी बंद झाल्यापासून सर्व कामगार कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करीतच आहेत. तरीही कामगारांची सतावणूक कंपनीने चालू ठेवली आहे. सध्या ई. लिलावाच्या खनिजाची वाहतूक सुरू आहे. मात्र कामगारांच्या भवितव्याचे कंटनीला किहीच पडून गेलेले नसून कंपनी कामगारांवर अन्याय करीत आहे. अशी तक्रार यावेळी कामगारांनी केली. खाणी सुरू होईपर्यंत तरी सरकारने कामगारांच्या हिताचा विचार करावा अणि कामगारांना दिलासा द्यावा. अशी मागणी कामगारांनी केली.
कंपनीने सध्या आमचा पगार अर्धा केल्याने घरखर्चासाठी पैसे कमी पडत आहेत. त्यावर आम्ही सर्व कखमगार कर्जबाजारी झालेलो असल्याने संसार कसा चालवायचा, मुला बाळांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा ? असे अनेक प्रश्न सध्या डोक्मयात घर करून आहेत. व या गोष्टींचा परिणामही आमच्या संसारावर दिसून येऊ लागला आहे. सध्या येणारा पगार हा बँकातील कर्जाच्या हप्त्यातच अर्ध्याच्यावर संपतो, आणि हातात जेमतेम पैसे येतात. या पैशातून संसाराचा गाडा कसा पुढे हाकायचा ? या सर्व विवंचनेत सध्या आम्ही वैफल्यग्रस्त बनत चाचलो असून महाराष्ट्रातील शेतकऱयांप्रमाणे आमच्यावरही आत्महत्या करण्याची पाळी येणार, अशी व्यथा दिपक पोपकर, इंद्राकात फाळकर, आदी कामगारांनी सभापतींसमोर मांडली.
सेसा कंपनीच्या अन्य युनिटच्या कामगारांना सध्या कंपनी पूर्ण वेतन देत आहे. मात्र डिचोलीतील कंपनीच्या कामगारांना अर्धा पगार देऊन देऊन कंपनी कामगारांची फसवणूक करीत आहे. असे नारायण गावकर यांनी म्हटले. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर, नारायण गावकर, राजेश गावकर, बाबुसो कारबोटकर, दिपक पोपकर, रत्नाकांत शेटय़?, अनिल सालेलकर, महेश होबळे, किशोर लोकरे व इतर कामगार मोठय़ा संख्येने कामगार उपस्थित होते.