व्हाईस प्रेसिडेंटपदी विवेक गुप्ता : किरण ठाकुर, विलास मराठे, योगेश जाधव यांची कार्यकारिणीवर निवड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय वृत्तपत्र संघटनेच्या (इंडियन न्यूजपेपर सोसायटी) अध्यक्षपदी ‘आज समाज’ या वृत्तपत्राचे संपादक राकेश शर्मा तर व्हाईस प्रेसिडेंटपदी विवेक गुप्ता (सन्मार्ग) यांची निवड झाली आहे. संघटनेच्या कार्यकारिणीवर तरुण भारतचे समुह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, विलास मराठे (दै. हिंदुस्थान, अमरावती) यांची फेरनिवड तसेच योगेश जाधव (पुढारी) निवड करण्यात आली. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली.
राकेश शर्मा यांची निवड 2023-2024 या वर्षासाठी करण्यात आली आहे. ते साक्षी या वृत्तपत्राचे संपादक के. राजा प्रसाद रेड्डी यांचे स्थान घेणार आहेत. ‘मातृभूमी’चे श्रेयांस कुमार संघटनेचे याच कालावधीसाठी उपाध्यक्ष म्हणून उत्तरदायित्व स्वीकारत आहेत. विवेक गुप्ता (सन्मार्ग) हे व्हाईस प्रेसिडेंट तर तन्मय माहेश्वरी (अमर उजाला) हे मानद खजिनदार म्हणून निवडले गेले आहेत. संघटनेच्या महासचिवपदाचे उत्तरदायित्व मेरी पॉल यांच्याकडे आहे.
कार्यकारिणीचे इतर सदस्य पुढील प्रमाणे- बालसुब्राम्हणियम आदित्यन (दै. थांथी), गिरीश अग्रवाल (दै. भास्कर), समाहित बाळ (प्रगतीवाडी), समुद्र भट्टाचार्य (हिंदुस्थान टाईम्स पाटणा), होरमुसजी एन. कामा (बाँबे समाचार), गौरव चोप्रा (फिल्मी दुनिया), विजय कुमार चोप्रा (पंजाब केसरी जालंदर), करण राजेंद्र दर्डा (लोकमत औरंगाबाद), विजय जवाहरलाल दर्डा (लोकमत नागपूर), जगजीतसिंग दारडी (चऱ्हदीकला), विवेक गोयंका (इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), महेंद्र गुप्ता (दै. जागरण), प्रदीप गुप्ता (डाटाक्वेस्ट), संजय गुप्ता (दै. जागरण वाराणसी), शिवेंद्र गुप्ता (बिझनेस स्टँडर्ड), सरविंदर कौर (अजीत), आर. लक्ष्मीपती (दिनमला), हर्ष मॅथ्यू (वनिथा), अनंत नाथ (गृहशोभिका मराठी), प्रताप पवार (सकाळ), राहुल राजखेवा (द सेंटीनेल), आर. एम. आर. रमेश (दिनकरन), अतिदेब सरकार (द टेलिग्राफ), पार्थ सिन्हा (नवभारत टाईम्स), प्रवीण सोमेश्वर (हिंदुस्थान टाईम्स), बिजू वारघेसे (मंगलम
प्लस), आय. वेंकट (इनाडू आणि अन्नदाता), कुंदन व्यास (व्यापार), के. एन. तिलककुमार (डेक्कन हेरॉल्ड, प्रजावाणी), रविंद्र कुमार (द स्टेटस्मन), किरण वडोदरीया (वेस्टर्न टाईम्स), टी. व्ही. चंद्रन (गृहलक्ष्मी), सोमेश शर्मा (राष्ट्रदूत साप्ताहिक), जयंत मॅथ्यू (मल्याळ मनोरमा), शैलेश गुप्ता (मिड डे), एल. आदीमूलम (हेल्थ अँड अँटिसेप्टिक), मोहित जैन (इकॉनॉमिक टाईम्स) आणि के राजा प्रसाद रेड्डी (साक्षी) यांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली.