बेळगाव :
आयकर विभागातर्फे गुरुवारी टिळकवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये ‘विवाद से विश्वास’ योजना हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला करदाते, सीएस, आयटीपीएस आणि भागधारक उपस्थित होते.
याप्रसंगी आयकर विभागाचे सहआयुक्त राजेश्वरी आर. मेनन, चेतन कळमकर, आयकर विभागाचे उपायुक्त पद्मापती देसाई यांनी विचार व्यक्त करून भागधारकांशी संवाद साधला.
यावेळी उपायुक्त पद्मापती देसाई यांनी ‘विवाद से विश्वास’ याविषयी महत्त्व सांगून भविष्यात या योजनेची अंमलबजावणी कशी करावी? याबाबत स्पष्ट केले. याप्रसंगी उद्योगपती टी. डी. काटवा यांनी या योजनेचे फायदे-तोटे सांगून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे सांगितले.
याप्रसंगी करदाते उपस्थित होते. नितू भट्ट यांनी आभार मानले.