इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील भोने माळ परिसरात भरदिवसा वृद्ध महिलेचे हात-पाय बांधून, तिला मारहाण करीत, तिच्या अंगावर पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. जखमी विमल पाटील या वृद्ध महिलेला आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. चोरी करणारे दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
जखमी विमल पाटील ही वृद्धा दोन मुली भोने परिसरात दोन मुलीसह भाड्याच्या घरात राहत आहे. दोन्ही मुली गुरुवारी सकाळी आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडल्या. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात युवक या वृद्ध महिलेच्या घरी आले.
काहीतरी काम असल्याचा बहाणा करीत त्यांनी विमल पाटील यांच्याकडे पाणी पिण्यास मागितले. त्यानंतर विमल पाटील यांनी स्वयंपाक घरातून पाणी घेऊन बाहेर आल्या. त्यानंतर पाणी पिऊन त्या दोन अज्ञात व्यक्तीने त्यांना ओढत स्वयंपाक घरात नेले. त्यानंतर घरातील कपड्याच्या साहाय्याने त्यांचे हात पाय बांधले. अंगावरीलसर्व प्रकारचे दागिने हिसकावून घेवून पोबारा केला.