जीएसटी, पेडिटसह जीएसटीआर-3बी साठी सवलत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा विळखा सर्वांच्या काळजीत वाढ करत आहे. परंतु सरकार विविध टप्प्यांवर विविध उपाययोजना करुन वेगवेगळय़ा क्षेत्रातून दिलासा देण्याचे काम करत आहे. सध्या केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कर्जांचे हप्ते भरण्यात आगामी तीन महिन्यांसाठी सवलत देण्याची विनंती बँकांना केली होती.
ई-वे बिलाचा कालावधी येत्या 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. यांचा कालावधी 20 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत निश्चत होता. परंतु हा कालावधी पुढे 30 एप्रिलपर्यंत पुन्हा वाढविला आहे. त्यामुळे ई-वे बिलाचा कालावधी 16 ते 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. या निर्णयाने वाहतूकदार आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असल्याने नवीन ई वे बिल तयार करावे लागणार नाही.
लॉकडाउनचा वाहतूकदारांना फटका
सध्या संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे विविध राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आणि याचा सर्वाधिक फटका ट्रक ड्रायव्हर आणि व्यापाऱयांना बसत आहे. ट्रकमध्ये भरण्यात आलेल्या मालांवरील आकारण्यात येणाऱया ई-वे बिलाचा कालावधी समाप्त झाला आहे. यामुळे अर्थमंत्रालयाने अस्थायीच्या पातळीवर फेब्रुवारी ते ऑगस्टसाठी जीएसटी पेडिटचा लाभ घेण्यासाठी आकारण्यात येणाऱया प्रतिबंध अस्थायी रुपाने हटविण्यात आला आहे. या निर्णयामुळे व्यापाऱयांना आपले आर्थिक नुकसान भरुन काढण्यास मोठी मदत होणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे देशातील जवळपास 1.2 कोटी टॅक्स पेअरला फायदा होणार आहे.
जीएसटीआर 3बी सवलत
सरकारने फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत जीएसटीआर3 बी रिटर्नमध्ये उशिर झाल्यास त्यावर दंड आकारण्यात येणार नाही. यामुळे जर 5 कोटीपेक्षा अधिक कमाईवर फेब्रु ते एप्रिल या कालावधीत जीएसटीआर 3बी रिटर्न अर्ज 24 जूनपर्यंत भरण्यासाठी सवलत मिळणार आहे. अशीच सवलत रक्कमेच्या आकडेवारीवर निश्चिती होणार असल्याचेही सांगितले आहे.