वृद्ध मालकाला नोकराचा गंडा, 1 लाख 80 हजार परस्पर काढले
प्रतिनिधी/ सातारा
वृद्ध घरमालकाचे एटीएम कार्ड चोरून साथीदाराच्या मदतीने त्यांच्या खात्यातील 1 लाख 18 हजार रुपयांची रक्कम काढून लंपास केली असल्याची घटना दि 9 रोजी उघडकीस आली. याप्रकरणी हणमंत बाबुराव चव्हाण (वय 70, रा. 26, आर्मी ऑफिसर कॉलनी, सदरबझार सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून नोकर लक्ष्मण काशिनाथ क्षीरसागर (रा. कुरूडवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) याच्यासह दशरथ (पूर्ण नाव माहीत नाही) रा. केसरकर पेठ, सातारा या सहकाऱयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हणमंत चव्हाण हे वृद्ध असल्याने त्यांनी लक्ष्मण क्षिरसागर यास नोकर म्हणून कामास ठेवले होते. घरमालक वृद्ध असल्याचा फायदा घेत नोकर लक्ष्मण क्षीरसागर याने घरमालकाचे सिंडिकेट बँकेचे एटीएम चोरले. त्यानंतर त्याचा सहकारी मित्र दशरथ याच्या मदतीने दोघांनी घरमालक हणमंत चव्हाण यांच्या सिंडिकेट बँक सदरबझार शाखा, सातारा येथील खात्यातील 1 लाख 18 हजार रुपये रक्कम 5 नोव्हेंबर 2018 ते 6 नोव्हेंबर 2018 व 6 जानेवारी 2019 ते 9 जानेवारी 2019 या दरम्यान वेळोवेळी काढली. आपल्या खात्यातून रक्कम परस्पर कोणीतरी काढून घेतल्याचे लक्षात येताच हणमंत चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून लक्ष्मण क्षीरसागर व दशरथ याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.