मर्चंट असोसिएशनचे एपीएमसी अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
एपीएमसी मर्चंट असोसिएशनच्यावतीने एपीएमसीचे अध्यक्ष व सचिवांना व्यापाऱयाच्या अनेक अडचणी व गैरसोयींबाबत नुकतेच निवेदन दिले आहे. या निवेदनात व्यापाऱयांना येणाऱया अडचणीसंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी याबाबत सर्वती सोय करू, असे आश्वासन अध्यक्ष आनंद पाटील यांनी दिले आहे.
या निवेदनात व्यापारी बंधूंच्या मागणीपैकी मालमत्ता खरेदी (दुकान) नावनोंदणी व वारसा करून दुकान व्यापाऱयाच्या नावे एपीएमसीच्या दप्तरी नोंद करून त्याचे हक्कपत्रही संबंधित व्यापाऱयांना देण्यात यावे. शुल्क न भरता व्यापार करणाऱया व्यापाऱयांवर कारवाई करण्यात यावी. याचबरोबर एपीएमसी आवारात भटक्मया जनावरांचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
एपीएमसी आवारातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. तर पथदीप आणि पाण्याची समस्याही डोके वर काढत आहे. त्यामुळे या सर्व सोयी सुरळीत देण्यासाठी अध्यक्ष व सचिवांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. या सर्व समस्यांमुळे व्यापाऱयांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याचा विचार करून सर्व सुविधा पुरविण्याच्या दृष्टिने पाऊल उचलावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष आनंद पाटील म्हणाले, आजच आमची मार्केट समितीची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने प्रलंबित कामांबाबत चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पाणी, लाईट, रस्ते आधी कामासंदर्भातील गैरसोयींचे निवारण करू, असे आश्वासन व्यापाऱयांना देण्यात आले. यावेळी एपीएमसीचे महेश कुगजी, आर. के. पाटील, तानाजी पाटील, मनोज मत्तिकोप, लगमा नाईक हजर होते.
निवेदन देतेवेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष एन. एस. झंगरूचे, उपाध्यक्ष चेतन खांडेकर, सचिव माणिक होनगेकर, खजिनदार विनायक होनगेकर, सदस्य सुधीर पाटील, दत्ता पाटील, राहुल होनगेकर, विक्रमसिंह कदम-पाटील, नरसिंह पाटील, सुरेश जाधव, मोहन कुटे, समशेर, अली अन्सारी, राजू जाधव, व्यापारी एन. एस. कडुकर, हेमंत पाटील, दत्ता नाकाडी, कृष्णा पाटील, मोहन बेळगुंदकर, एम. जी. मरणहोळकर, आर. बी. पाटील, बी. के. तरले, विश्वास घोरपडे, गजानन घोरपडे, अशोक बामने, सि. व्ही. खानोलकर, बंडू मजूकर, राजू हांगीरकर, सुरेश नार्वेकर, बाळू पाटील, राहुल देसूरकर, विनायक पाटील, वामन पाटील, विनोद होनगेकर, रामा पाटील, पिंटू परुळेकर, दीपक होनगेकर, डी. बी. देसाई, महेश देसाई, तानाजी इरोजी, भैरू पाटील, विनायक मोरे आदी व्यापारी उपस्थित होते..