सेऊल : एलजी इलेक्ट्रॉनिक्सने दक्षिण कोरियामध्ये आपला नवा सिनेमा प्रोजेक्टर नुकताच लॉन्च केला आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी घरातच राहण्यास पसंती दर्शवली आहे. यादरम्यान फ्लॅट टीव्हींच्या मागणीत वाढ झाली आहे. हे पाहूनच घरातील सदस्यांच्या मनोरंजनासाठी म्हणून कंपनीने नवा सिनेमा प्रोजेक्टर दाखल केला आहे. सिनेबीम लेझर फोर के नावाने कंपनीने प्रोजेक्टर दाखल केला असून यात अनेक वैशिष्टय़े समाविष्ट असणार आहेत. या प्रोजेक्टरची किंमत 3400 डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना हा प्रोजेक्टर इएमआय स्वरूपातही घेता येणार आहे.
Previous Articleमहान फुटबॉलपटू दिएगो माराडोना कालवश
Next Article बायोकॉन हिंदुजामध्ये वाटा घेणार
Related Posts
Add A Comment