बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने राज्यातील १२ वी परीक्षा रद्द तर दहावी ची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्य सरकार पीयूसीच्या दुसर्या वर्षाच्या गुणांऐवजी सामान्य प्रवेश परीक्षा आणि राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेच्या गुणांचा विचार करण्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी शनिवारी सांगितले. तसेच किमान गुणांची तरतूद रद्द करण्यासाठी कर्नाटक शिक्षण कायद्यात सुधारणा करण्याची गरज उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांनी व्यक्त केली. यासंदर्भात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांचा प्रस्ताव विचारात घेतला जाईल, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
या शैक्षणिक वर्षात कोरोना रुग्णवाढीमुळे पीयूसी विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पदोन्नती देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री एस. सुरेश कुमार यांनी शुक्रवारी केली. यांनतर बोलता मंत्री सुरेश कुमार म्हणाले होते की विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रथम पीयूसीच्या गुणांचा विचार केला जावा. त्या गुणांच्या आधारावर प्रवेश देण्यात यावा असे म्हंटले होते. तसेच मंत्री “सुरेश कुमार यांनी अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी किमान गुणांचे निकष दूर करण्याचा चांगला सल्ला दिला आहे. त्याऐवजी त्यांनी सीईटी रँकचा विचार करावा, असे सुचविले आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी आणि उच्च शिक्षण विभागाशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेतला जाईल,” असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
किमान गुणांची तरतूद रद्द करण्यासाठी कर्नाटक शिक्षण कायद्यात सुधारणा करण्याची गरज नारायण यांनी व्यक्त केली. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता एसएसएलसी म्हणजेच दहावीच्या परीक्षा जुलैच्या तिसर्या आठवड्यात घेण्यात येतील, अशी घोषणा राज्य सरकारने शुक्रवारी केली होती.