बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक मंत्रिमंडळाने बुधवारी कर्नाटक विधिमंडळाचे संयुक्त अधिवेशन २८ जानेवारीपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चमध्ये होण्याचे संकेत दिले.
कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनीआम्ही २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारीदरम्यान संयुक्त अधिवेशन तात्पुरते घेण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त अधिवेशनात भाषण करण्यासाठी राज्यपालांना आमंत्रित केले जाईल. ते राज्यपालांच्या अभिभाषणापुरते मर्यादित राहतील, असे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बजेट अधिवेशन मार्चमध्ये अस्थायीपणे होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनासाठी गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा व विधानपरिषद दोन्ही सभागृहांचे अधिवेशन १० डिसेंबर रोजी तहकूब करण्यात आले होते.
तथापि, विधानपरिषदेची १५ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा बैठक झाली, त्यादरम्यान भाजप-जेडीएस आणि कॉंग्रेसच्या सदस्यांनी शिवीगाळ करत एकमेकांना ढकलले आणि उपसभापतींना बेकायदेशीर अध्यक्षीय खुर्चीवर बसविले होते . काँग्रेसने त्यांना अध्यक्षीय खुर्चीवरून बाजूला केले. यावेळी अध्यक्ष के. प्रतापचंद्र शेट्टी यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला होता.