बेंगळूर/प्रतिनिधी
ऑगस्टच्या सुरुवातीस मुसळधार पाऊस आणि पुरामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याविषयी कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राने (केएसएनएमडीसी) सादर केलेल्या अहवालानंतर कर्नाटक सरकारने गुरुवारी २३ जिल्ह्यातील १३० तालुके पूरग्रस्त म्हणून घोषित केले.
कर्नाटक सरकारने जरी केलेली अधुकृत आदेशामध्ये पुढील कारवाई होईपर्यंत या भागांना तातडीने पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तालुके आहेत (१४) तर चामराजनगर आणि मंड्या जिल्ह्यात कमीतकमी अशा एक पूरग्रस्त क्षेत्राचा समावेश आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी नुकत्याच झालेल्या पुरामुळे राज्यात ८०७१ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे केंद्रीय पथकाच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी ही माहिती दिली होती