प्रतिनिधी/ पणजी
पणजी येथील कस्तुरबा मातोश्री हायस्कूलच्या नवीन इमारतीची पायाभरणी सोमवारी संपन्न झाली. या वेळी रोटरी क्लब पणजीचे अध्यक्ष शे.वीरेश नाडकर्णी, हायस्कूलचा नवीन इमारतीचे प्रकल्प अध्यक्ष रो. श्री वराठा सरदेसाई, प्रकल्प समन्वयक शे. राजीव मराठे व अन्य रोटेरियन पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, पणजीचे महापौर उदय मडकईकर, कस्तुरबा मातोश्री हायस्कूलचे अध्यक्ष व स्त्राr शिक्षण प्रवर्तक मंडळाचे खजिनदार नारायण कामत, हायस्कूलचे व्यवस्थापक व स्त्री शिक्षण प्रवर्तक मंडळाचे अध्यक्ष नरेश सिरसाट उपस्थित होते. तसेच स्त्री शिक्षण प्रवर्तक मंडळाचे सचिव प्रकाश नाईक, सदस्य विजय राजगोळकर, मधुकर चोडणकर, सुरेखा प्रभु व हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्वेत डिसूझा उपस्थित होत्या. हायस्कूलचा शिक्षक तसाच शिक्षकेतर वर्ग उपस्थित होता.
भूमिपूजनाला पुरोहित म्हणून गुरुदास कोरडे लाभले होते. श्री . सौ. नरेश सिरसाट यांनी भूमिपूजन केले. रोटरी कल्ब पणजीच्या सहकार्याने विद्यालयाच्या नवीन इमारतीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. लवकरात लवकर कस्तुरबा मातोश्री हायस्कूलची नवीन इमारत पूर्णपणे तयार करुन देऊ. असे आश्वासन जिल्हा रोटरी राज्यपाल रो. श्री गौरीश धोंडे यांनी दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यकांत नाईक यांनी तर आभार प्रदर्शन सौ. श्रद्धा सूर्लकर यांनी केले.