वार्ताहर /काकती
येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान मंदिराला नंदिहळ्ळी गावातील जाधव बंधूंच्यावतीने 2 लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. देवस्थानचे अध्यक्ष सिद्दाप्पा टुमरी (गाडेकर) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
स्वागत व प्रास्ताविक देवस्थानचे पंच लक्ष्मण पाटील यांनी केले. नंदिहळ्ळी गावचे नारायण मष्णू जाधव, मारुती रामू जाधव, मनोहर हणमंत जाधव, कल्लाप्पा कृष्णा जाधव, अशोक हणमंत जाधव, लक्ष्मण भरमा जाधव, सिद्राम यल्लाप्पा जाधव व काकतीचे शिवाजी चौगुले व्यासपीठावर उपस्थित होते. नंदिहळ्ळी गावचे महादेव व निंगाप्पा जाधव यांनी समस्त जाधव परिवाराच्यावतीने 2 लाख 11 हजार 111 रुपयांचा रोख धनादेश देवस्थानचे अध्यक्ष सिद्दाप्पा टुमरी, उपाध्यक्ष शिवाजी नरेगवी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी बोलताना महादेव जाधव म्हणाले, नंदिहळ्ळी गावात जाधव कुटुंबीय मोठे घराणे असून जवळपास 80 घरे आहेत. जाधव कुटुंबीयांचे कुलदैवत काकती श्री सिद्धेश्वर असून मूळचे काकतीचे चौगुले घराण्याचे आहे. सिद्धेश्वराचा महिमा अगाध असून, प्रामाणिक परिश्रम करणाऱया भाविकाला बळ देतो. ही जाणीव ठेवून ही देणगी स्वयंस्फूर्तीने दिली आहे, असे मनोगत व्यक्त केले. देवस्थानचे पंच सिदराई ल. गवी यांनी सिद्धेश्वरचा इतिहास व नंदिहळ्ळी गावच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. मनोहर परमोजी यांनी जाधव घराण्याच्या भारतीय सेनेतील देशसेवेच्या कार्याचा गौरव करून आभार मानले. यावेळी भावकाण्णा टुमरी, शिवाजी धायगोंडे, भावकाण्णा मुंगारी, कृष्णा निलजकर, बसवराज घाणगेर, सुरेश गवीसह इतर उपस्थित होते.