वार्ताहर/ कणगले
प्रतिवर्षानुसार येथील लक्ष्मी-व्यंकटेश मंदिराच्यावतीने रविवार 29 रोजी लक्ष दीपोत्सव कार्यक्रम झाला. मंदिर परिसरात दिवे लावून झाल्यानंतर लक्ष्मी व्यंकटेशाची महाआरती करण्यात आली. या दीपोत्सवास विनायक कुलकर्णी, जयंत कुलकर्णी, विदुला कुलकर्णी, प्रांजली कुलकर्णी, चिदानंद कुलकर्णी, सुलभा कुलकर्णी, बाळासो पुजारी, आदिराज व्हटेकर, आनंद पुजारी, विवेक पुजारी, जोतिबा कडलगे, विरपाक्षी कडलगे, श्रीकांत किवंडे उपस्थित होते.
लक्ष्मी मंदिरात पूजन
नरसिंह देवस्थानात कार्तिक स्वामी यांचे पूजन कृतिका नक्षत्रावर करण्यात आले. प्रारंभी अरविंद कमते यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर दिपार्चना पद्मजा जडगे व हेमा पाटील यांनी केले. कमते गुरुजींनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमास दत्तात्रय खाडे, आर. के. दलवाई, अशोक लगली, बाजीराव लगली, अशोक मगदूम, तानाजी माने, विनायक माळी, मारुती हात्रोटे उपस्थित होते.