मृत्यूंजयनगर अनगोळ येथील घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
दोन कारची धडक होऊन झालेल्या अपघातात महिला जखमी झाल्याची घटना मृत्यूंजयनगर अनगोळ येथे दुर्गा स्विमिंग पूलच्या चौकात घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उत्तरेकडून जाणाऱया बीएमडब्ल्यू कारने पूर्वेकडून जाणाऱया वेर्णा कारला धडक दिल्याने वेर्णा कार पलटी होऊन स्विमिंग पूलच्या भिंतीला धडकली. यात सदर कारमधील महिलेच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. स्मार्टसिटी अंतर्गत या रस्त्यावर पेव्हर्स घातले आहेत. पण यामुळे दुचाकी घसरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनचालकांचा हलगर्जीपणाही अपघातांना तितकाच कारणीभूत ठरत आहे. परिणामी अपघात टाळण्यासाठी वाहनधारकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.