प्रतिनिधी/ नागठाणे
काशिळ (ता.सातारा) येथील काशिळ-पाली रोडवर असलेले एक सरकारमान्य देशी दारूचे दुकान व एक बिअर शॉपी अज्ञात चोरटय़ाने फोडून तेथून सुमारे 3.50 लाख रुपये किमतीची देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व एक डी व्ही आर मशीन चोरून नेले.शनिवार रात्री ते सोमवार सकाळच्या दरम्यान अज्ञात चोरटय़ाने ही दोन्ही दारूची दुकाने फोडली.याची फिर्याद मुकेश गुरमुखदास उदासो (रा.साईबाबा बंगला, तुळजाईनगर,मलकापूर, कराड) यांनी सोमवारी उशिरा बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.दरम्यान,पाचच दिवसांपूर्वी याच रस्त्यावर असलेले एक परमिट रूम बिअरबार अज्ञात चोरटय़ांनी फोडून सुमारे 70 हजार रुपये किमतीचा मद्यसाठा चोरून नेल्याची घटना घडली होती. काही दिवसांच्या अंतराने झालेल्या या दोन जबरी चोयांमुळे काशीळ परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून बोरगाव पोलिसांसमोर एक आव्हान उभे केले आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काशिळ ते पाली जाणाया रस्त्यावर मुकेश गुर्मुखदास उदासो यांच्या मालकीचा सरकारमान्य देशी दारू विक्रीचे दुकान आहे. त्याच्या लगतच सरकारमान्य बिअर शॉपी ही आहे. 25 जानेवारी रोजी रात्री नेहमीप्रमाणे हि दोन्ही दुकाने बंद करण्यात आली होती. दुस्रया दिवशी 26 जानेवारी निमित्त ड्रायडे असल्याने दुकाने बंद होती. 27 जानेवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ही दोन्ही दुकाने उघडण्यास कामगार आले असता देशी दारूच्या दुकानाचे कुलूप तोडलेले व शटर उचकटलेले आढळले असाच प्रकार शेजारी असलेल्या बिअर शॉपीच्या बाबतीतही घडला असल्याचे निदर्शनास आले.
अज्ञात चोरटय़ांनी दोन्ही दुकाने फोडून या दुकानातून देशी दारुच्या 70 बाटल्या, किंगफिशर नॉकआउट, कालबर्गस, हंटर इत्यादी कंपनीच्या सुमारे 2954 बिअरच्या बाटल्या ,एक सीसीटीव्ही डी व्ही आर मशीन व रोख रक्कम असा सुमारे 3.50 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निदर्शनास आले. सोमवारी सायंकाळी उशिरा या चोरीची फिर्याद बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर करत आहेत
सुमारे पाच दिवसांपूर्वीच याच रस्त्यावर असलेल्या हॉटेल मनाली परमिट रूम व बियर बार येथेही अशाच प्रकारची चोरी झाली होती .रात्री बंद केलेले हे हॉटेल अज्ञात चोरटय़ाने फोडून येथूनही सुमारे 70 हजार रुपये किमतीचा मद्याचा साठा अज्ञाताने पळविला होता .या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. काही दिवसांच्या अंतराने एकाच रस्त्यावरील सलग दोन मदय विक्री करणारी दुकाने फोडून मोठा मुद्देमाल लांबवण्यात चोरटय़ांना यश आले आहे. मात्र या दोन्ही जबरी चोयांमुळे बोरगाव पोलिसांसमोर मात्र एक मोठे आव्हान उभे केले आहे.