पेडणे ( प्रतिनिधी )
पेडणे पोलिसांनी मांदे बीचमधून पर्यटकांच्या मौल्यवान वस्तू चोरी केल्याप्रकरणी दोघा चोरांना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार करण वाही, वय 26 वर्ष, राहणारा मुंबई यांनी फोन करुन की तो आपल्या मिञासह गोव्याला सुट्टीसाठी आला होता आणि 5 मार्च रोजी मांदे किनारी गेला. संध्याकाळी आमचे मिञ जेव्हा पर्यटक पोहण्यासाठी गेले असता त्यांनी किनाऱयावर सामान ठेवले होते. परत आल्यावर पर्यटकांच्या लक्षात आले की त्यांचे सामान आयफोन 11, आयफोन 10, एअरपॉड्स, बा?श स्पीकर्स, गॉगल्स, पेडिट कार्ड असलेले पाकिट आणि रोकड दहा हजार चोरीला गेले.
माहिती मिळाल्यानंतर पेडणे पोलिसांनी आरोपी व्यक्तींचा मोठय़ा प्रमाणात शोध सुरू केला. विविध पथके तयार केली गेली आणि शॅक, हॉटेल, रिसॉर्ट्स इत्यादी ठिकाणी शोधा शोध करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले.
पोलिसांना संशयास्पदरीत्या फिरणाऱया एका स्कूटरवर फिरत असल्याचे निदर्शनास आले. जी.ए -11-टी 1635 या क्रमांकाची दुचाकी गाडी सीसीटीव्ह निदर्शनास आली.त्यानुसार आरोपींचा शोध घेण्यात आला. आणि संशयीत आरोपी चंदन भंवरलाल साहू, वय 23 वर्षे आणि विशाल भवानीशंकर साहू, वय 22 वर्षे राहणारे आर. कृष्णा कॉलनी, सुशीलापूर, जयपूर राजस्थान अशी नावे आहेत. दोघेही चुलतभाऊ आहेत. ते 27 फेब्रुवारी रोजी गोव्यात आले होते. आणि भाडय़ाने दुचाकी घेऊन चोरीस जात होते. पोलिसांनी आरोपींकडून चोरी करण्यासाठी वापरल्या गेलेल्या वाहनासह संपूर्ण चोरीची मालमत्ता जप्त केली आहे.
पोलीस निरीक्षक जिवाबा दळवी यांच्या अध्यक्षतेखालील , पीएसआयचे संजीत खानोलकर, विवेक हळणकर. पीसी रवी मालोजी, अनीश पोके, विनोद पेडणेकर यांनी अटक आरोपींवर संपूर्ण कारवाई यशस्वीरित्या केली. आरोपीवर गुन्हा नोंद करुन दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.