प्रतिनीधी / हातकणंगले
कुंभोज ता.हातकणंगले येथे अवैद्यरित्या गुटखा विक्री करणाऱ्या दोघांनवर हातकणंगले पोलीसांनी कारवाई केली. यामध्ये कुंभोज येथील देवमोरे मेडिकल समोर ३ री गल्ली दानोळी रोड परीसरात अवैद्य रित्या गुटखा विकणाऱ्या सुभाष बाबासो शिंदे(वय४०) राहणार माळ भाग कुंभोज यांच्यावर कारवाई करून त्याच्याकडील गुटख्याच्या साहित्यासह ७,ooo किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर दानोळीरोड वरील पुजारी किराणा दुकानासमोर सुदर्शन रंगराव पुजारी( वय ३० )रा. मिसाळ गल्ली,कुंभोज हा अैवद्यरित्या गुटखा विकत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करून त्याच्याकडील मोटरसायकल एम एच - ०९ -२६९५ असे एकूण १८,३२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई परि.पोलीस उपअधिक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.अधिक तपास अनुक्रमे पोलिस उपनिरीक्षक युवराज सुर्यवंशी व भिमराव धोतरे करत आहेत.