तीन महिन्यांपूर्वी घडली होती घटना
प्रतिनिधी / बेळगाव
तीन महिन्यांपूर्वी भटक्मया कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विजयनगर-हिंडलगा येथील एका बालकाचा शनिवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
मोहन लक्ष्मण सिद्दापूर (वय 8) असे त्याचे नाव आहे. मोहनचे कुटुंबीय मूळचे गोकाक तालुक्मयातील सिलतीभावीचे राहणारे असून कामानिमित्त विजयनगर हिंडलगा येथे सध्या त्यांचे वास्तव्य आहे. तीन महिन्यांपूर्वी भटक्मया कुत्र्याच्या हल्ल्यात तो जखमी झाला होता.
त्याला एक इंजेक्शन दिल्यानंतर काही ठिकाणी खासगी उपचारही करण्यात आले. त्याची प्रकृती खालावल्याने शनिवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता थोडय़ा वेळात त्याचा मृत्यू झाला. कॅम्पचे पोलीस निरीक्षक संतोषकुमार पुढील तपास करीत आहेत.