बेळगाव : आपल्या आरोग्यासंदर्भात प्रत्येकाने जागरुक राहिले पाहिजे. त्यासाठी आरोग्य शिबिरे महत्त्वाची आहेत. या शिबिरांमुळे आपल्या आरोग्याबाबत आपल्याला माहिती मिळते आणि काळजी घेता येते, असे मत जेएनएमसीच्या प्राचार्या डॉ. निरंजना महांतशेट्टी यांनी व्यक्त केले. केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटल, टिळकवाडी क्लब बेळगाव यांच्यावतीने शुक्रवारी टिळकवाडी क्लब येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर डॉ. महांतशेट्टी बोलत होते. अध्यक्ष म्हणून प्रा. एस. वाय. प्रभू उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. राजेश पवार, डॉ. डांगे, डॉ. अंजली जोशी, डॉ. शीला पोतदार, डॉ. अल्लमप्रभू, माजी नगरसेवक पंढरी परब उपस्थित होते. डॉ. अंजली जोशी यांनी केएलई हॉस्पिटलमधील विविध योजनांबद्दल माहिती दिली. एस. वाय. प्रभू यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या. या शिबिरात शल्यविशारद, नाक, कान, घसा तज्ञ, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ तसेच जनरल फिजिशियन यांनी रुग्णांची तपासणी केली व सल्ला दिला. दुपारी 1 वाजेपर्यंत चाललेल्या शिबिराचा 1100 नागरिकांनी लाभ घेतला. 360 जणांची ईसीजी करण्यात आली. 350 जणांची ब्लड-शुगर तपासणी करण्यात आली. क्लबतर्फे डॉक्टरांच्या अल्पोपाहाराची सोय करण्यात आली. शरद पै यांनी भोजनाची सोय केली.
Previous Articleकेएलई आयुर्वेदिक कॉलेजमध्ये व्हाईट कोट डे कार्यक्रम
Next Article दहावी निकालासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment