केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने सिग्नेचर संघाचा, रॉजर्स संघाने युवराज संघाचा, तानाजी स्पोर्ट्स संघाने केएसएससी हुबळी संघाचा तर हुबळी स्पोर्ट्स क्लब सी संघाने विलास बेंदे संघाचा पराभव करून प्रत्येकी चार गुण मिळविले. सचिन रेवणकर तानाजी, राहुल हुबळी, आकाश कुलकर्णी (बेळगाव स्पोर्ट्स क्लब), रवळू पाटील (रॉजर्स बेळगाव) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब संघाने 29 षटकात सर्वबाद 173 धावा केल्या. सुरज तलवारने 36, चेतन तोरणगट्टीने 32, संतोष चव्हाण व रामनाथ काळे, विठ्ठल दुर्गाई यांनी प्रत्येकी 22, विशाल प्रभू व ओंकार नोरोलकर यांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे हर्ष पटेलने 25 धावात 4, अथर्व नुलीने 12 धावात 2, आकाश कुलकर्णीने 43 धावात 2, प्रमोद पालेकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 26.3 षटकात 2 बाद 175 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. आकाश कुलकर्णीने 11 चौकारासह 84, तनुष धुमालेने 5 चौकारासह 50, आशुतोष हिरेमठने 14, वेंकटेश राठोडने 10 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे विनायक सिद्दलिंग व ओंकार नोरोलकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात युवराज स्पोर्ट्स क्लबने 28.2 षटकात सर्व बाद 115 धावा केल्या. किरण तारळेकरने 23, कल्पेश संभोजीने 13, अजय बेनकेने 17 धावा केल्या. रॉजर्सतर्फे रवळू पाटीलने 19 धावात 3, विशाल वंडुरीने 16 धावात 3, सुशांत तुर्केवाडीकरने 8 धावात 2, शिवराज पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर्स संघाने 27.3 षटकात 8 बाद 116 धावा करून सामना 1 गडय़ाने जिंकला. रवळू पाटीलने 27, सचिन वन्नूरने 22, विशाल वंडूरी व संभाजी मासेकर यांनी प्रत्येकी 12, इनायत मुजावरने 10 धावा केल्या. युवराजतर्फे विजय धामणेकरने 17 धावात 3, अनुराग पाटीलने 29 धावात 2, किरण तारळेकर, जोतिबा गिलबिले, अजय बेनके यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
हुबळी केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब संघाने 30 षटकात 7 बाद 185 धावा केल्या. राहुलने 3 षटकार, 15 चौकारासह 103 धावा करून शतक झळकविले. आयुषने 27, इस्माईलने 20 धावा केल्या. विलास बेंदेतर्फे श्रीयांशू एन.ने 2, संदीप केदारी, अरूण साधण्णावर, बसवाण्णा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विलास बेंदे संघाचा डाव 23.3 षटकात सर्व बाद 148 धावात आटोपला. अरूण साधण्णावरने 2 षटकार, 5 चौकारासह 51, बसवाण्णाने 27, मृत्युंजयने 16, आनंद पाटीलने 12 तर ओम धोळीने 15 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्सतर्फे रेहान कित्तूर, आतिक झैरूद्दीन यांनी प्रत्येकी 2, अफरोज अली, अरविंद, अलफान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात कर्नाटक स्टार स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 9 गडी बाद 147 धावा केल्या. अफरोज अली व अजमल राजा यांनी प्रत्येकी 26, अलफान हुसेनने 20, अरविंदने नाबाद 21 धावा केल्या. तानाजी स्पोर्ट्सतर्फे इरफान इरानी, दुवाड यांनी प्रत्येकी 2 तर ताहीर, सचिन व रेहाक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना तानाजी स्पोर्ट्स अकादमीने 27.3 षटकात 9 बाद 149 धावा करून सामना 1 गडय़ाने जिंकला. दुवाड व अश्पाक मलिक यांनी प्रत्येकी 27, अलॅक्सने 18, सचिनने 14, कृष्णाने 13 तर रफिकने 14 केल्या. हुबळीतर्फे आतिक, रेहान, झैरूद्दीन यांनी प्रत्येकी 2, तर अफरोज अली, अरविंद, अलफान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.