खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी \ बेळगाव
केळकरबाग येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
संतोष शांताराम नरीम (वय 25, रा. केळकरबाग) असे त्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घरात कोणी नसताना संतोषने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. हा प्रकार उघडकीस येताच दोरी कापून सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार संतोष हा एका ट्रान्स्पोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करीत होता. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्याचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला आहे. यासंबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.