प्रतिनिधी / मडगाव
कोरोना व्हायरसमुळे सारे जग हादरले आहे. कोरोना व्हायरसमुळे बळींचा आकडा लाखाच्या पलिकडे गेला आहेत. त्यातही एक हॅप्पी स्टोरी असेल तर नक्कीच थोडासा दिलासा मिळतोय. गोव्यातील ‘सिंबा’ या कुत्र्यांच्या पिल्लूची ही हॅप्पी स्टोरी…
काणकोण येथील सिंबा नामक कुत्र्यांच्या पिल्लूचा पाठीचा कणा व्यवस्थित काम करीत नव्हता, त्यामुळे त्यांच्यावर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी उपचार केले पण त्याचे मागील पाय काम करु शकले नाहीत. त्याच्यासाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली होती. पोलंडमधून पर्यटक म्हणून गोवा भेटीवर आलेल्या जार्क आणि ईव्हा या जोडप्याने सिंबाचे संगोपन करण्यास सहमती दर्शविली व त्यांनी गोव्यात या जोडप्याने त्यांचे संगोपन सुरू केले.
मग ‘कोविड-19’ मुळे गोव्यात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे जार्क आणि ईव्हाला पोलंडला परत जावे लागले. त्यांना ‘सिंबा’लाही पोलंडला घेऊन जायचे होते. त्यांसाठी प्रथम त्यांनी पोलंडकडून परवानगी घेतली. पुढे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभाग, गोवा सरकारने आवश्यक वैद्यकीय तपासणी केली. पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभागाने सिंबाला ‘फिट फ्लाय’ प्रमाणपत्र दिले.
सर्व मंजुरी मिळाल्यानंतर सिम्बाने जार्कबरोबर हवाई प्रवास केला. सिंबा आता पोलंडमधील आपल्या नवीन घरात खूप आनंदी आहे. दक्षिण गोव्यातील ऍनिमल रेस्क्मयू सेंटर या एनजीओच्या जेनी ओकॉनर यांनी संपूर्ण ऑपरेशनचे यशस्वी संयोजन केले. पाठिचा कणा व्यवस्थित काम करत नसल्याने ‘सिंबा’चे मागील पाय काम करू शकत नव्हते. दुसऱया शब्दात सांगायचे झाल्यास अंपगत्व होते. मात्र, पोलंडच्या जोडप्याने त्याचे संगोपन करतानाच त्याला नवीन ‘लाईफ’ देखील दिले.