कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने प्रलंबित मागण्यांसाठी २६ मे रोजी निदर्शन
प्रतिनिधी / इचलकरंजी
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोविड काळात सर्व्हे व इतर कामाची सक्ती करू नये,कोरोना काम करत असताना मृत्युमुखी पडलेल्या सेविकांना विमा संरक्षण कायद्याने मिळणारी ५० लाख रुपयांची मदत तात्काळ मिळावी, पोषण ट्रॅकर ऍप मराठीत असलेच पाहिजे, अनेक सेविकांनी काम करून सुद्धा त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही, अंगणवाडी सेविका व मदतनीस जर कोरोना पॉझिटिव्ह आल्या तर त्यांचे दवाखान्याचे उपचार शासनामार्फत केले पाहिजे. या व इतर मागण्यासंदर्भात वारंवार निवेदन देवुन सुद्धा शासनाने कोणतीही दखल घेतली नाही या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने येत्या बुधवार २६ मे रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे
त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील किमान १०० गावात २६ मे रोजी दु १२ ते १ या वेळात सर्व ठिकाणी सेविका मदतनीस आपापल्या गावात अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतींसमोर निदर्शने करतील. यावेळी कोरोना संदर्भातील शासनाचे सर्व नियम पाळले जातील. सर्वजण सुरक्षित अंतर ठेवून मस्कचा वापर करून आंदोलनात सहभागी होतील व आपला निषेध नोंदवतील.
तरी या आंदोलनात सर्व सेविका मदतनीस यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड जयश्री पाटील व सरचिटणीस कॉम्रेड आप्पा पाटील यांनी केले आहे.