प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 20 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 677 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 307 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 11 हजार 234 झाली आहे.
जिल्हÎात रविवारी कोरोनाने 20 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 339 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 886, नगरपालिका क्षेत्रात 750, शहरात 1 हजार 138 तर अन्य 565 आहेत. दिवसभरात 1 हजार 307 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 76 हजार 904 झाली आहे. गेल्या 24 तासांत 677 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 28, भुदरगड 3, चंदगड 6, गडहिंग्लज 48, गगनबावडा 0, हातकणंगले 87, कागल 20, करवीर 102, पन्हाळा 32, राधानगरी 13, शाहूवाडी 4, शिरोळ 75, नगरपालिका क्षेत्रात 96, कोल्हापुरात 148 तर अन्य 15 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 93 हजार 477 झाली आहे.
शहरातील 5 जणांचा, सातारा जिल्ह्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू
परजिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील एकाचा तर कोल्हापूर शहरातील 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरात रविवारी 148 नवे रूग्ण दिसून आले तर 5 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू झालेल्यांत रविवार पेठ, साने गुरूजी वसाहत, कसबा बावडा, जाधववाडी, साने गुरूजी वसाहत येथील व्यक्तींचा समावेश आहे.