सांगरूळ / वार्ताहर
करवीर तालूक्यातील सांगरूळ येथील सांगरूळ मोरेवाडी दरम्यानच्या शेतीच्या परिसरात सकाळी ७ वाजता सात गव्याचा कळपाच दर्शन झाल्याने नागरिकांच्यात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भागात शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाचे वनपाल कोमल रहाटे यांनी केले आहे.
सांगरूळ – मोरेवाडी रस्त्यावर मारकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतीच्या भागात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दिसला. या सात गव्यापैकी तीन गवे जाधववाडी डोंगराच्या दिशेने गेले. तर चार गवे या परिसरातील ऊस शेतीमध्ये शिरल्याचे नागरिकांनी पाहिले .
आज दिवसभर वनपाल करवीर विजय पाटील यांचे मार्गर्शनाखाली वनपाल कोमल रहाटे वनरक्षक सुनिल हराळे, २ वनमजूर सोबत.डॉ. संतोष वाळवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वन्य जीवन संक्रमण व उपचार केंद्र अमित कुभार ‘ विकास पाटील घटनास्थळी थांबले होते.