वृत्तसंस्था/ नवीट दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीमध्ये माजी क्रिकेटपटू आर.पी. सिंग, मदनलाल आणि सुलक्षण नाईक यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये यापूर्वी एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांच्या जागी आर. पी. सिंग आणि मदनलाल यांची नियुक्ती केल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले. आर.पी. सिंग, मदनलाल आणि सुलक्षण नाईक यांची या पदासाठी एक वर्षाकरिता नियुक्ती राहिल. गेल्यावर्षी माजी कसोटीवीर कपिलदेव, अशुंमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यानी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता.