नवी दिल्ली : भारताची खनिज तेल आयात जूनमध्ये मागील नऊ वर्षात सर्वाधिक कमी राहिली आहे. जून 2009 नंतर प्रथमच व्हेनेएझुलामधून तेल आयात करण्यात आली नाही. रिफायनरीची देखभाल आणि अन्य कारणामुळे इंधनाची मागणी कमी राहिल्याच्या कारणामुळे खरेदीवर मोठय़ा प्रमाणात अंकुश लागल्याची माहिती आहे. पहिल्या सहामाहीत देशात काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे इंधनाची मागणी कमी प्रमाणात राहिली आहे. सदरची परिस्थिती ऑक्टोबर 2011 नंतर म्हणजे जवळपास 9 वर्षाच्या कालावधीनंतर निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले आहे. जगातील तिसरा सर्वाधिक मोठा तेल ग्राहक आणि आयातदार म्हणून भारताला ओळखले जात आहे. जूनमध्ये प्रतिदिन 3.2 दशलक्ष बॅरेल तेल प्राप्त करण्यात आले आहे. मे महिन्याच्या तुलनेत 0.4 टक्के आणि एक वर्षाच्या अगोदरच्या तुलनेमध्ये जवळपास 28.5 टक्क्मयांची घसरण राहिली होती. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसह देशातील टॉपच्या रिफायनरी, रिलायन्स इंडस्ट्रीज, जगातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असून पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या देखभालीची युनिटही बंद योजना बनवली आहे.
Previous Articleमहाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन होणार जाहीर
Related Posts
Add A Comment