प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील खाणीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी होणार असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती आता 26 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे. गोव्यातील खाणी त्वरित सुरू करण्याची मागणी घेऊन काही पंचायती, त्यांचे सदस्य व काही खाण कंपन्या यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. तिच्यावर काल सुनावणी होणार होती तथापि काही कारणाने ती होऊ शकली नाही.