अन्य राज्यमार्गांचा विकास कधी? : तालुक्मयातून सात राज्यमार्गांचा होतो उगम, मात्र अनेक राज्यमार्ग विकासापासून वंचित : विकासाकडे लक्ष देण्याची गरज
पिराजी कुऱहाडे /खानापूर
खानापूर तालुक्मयाच्या भौगोलिक क्षेत्रातून राज्यातील अनेक भागात जोडणाऱया मुख्य रस्त्यापैकी सात राज्यमार्ग खानापूर तालुक्मयाच्या हद्दीतून उगम पावतात. त्यापैकी जत-जांबोटी राज्य मार्गापैकी खानापूर-पारिश्वाड या राज्य मार्गाचा विकास झाला आहे. पण तालुक्यातून उगम होणाऱया अन्य राज्य मार्गाचा विकास कधी होणार, असा प्रश्न प्रवासी वर्गातून होत आहे. तालुक्मयातून सुरुवात होणाऱया या सात रस्त्यांमध्ये खानापूर-ताळगुप्पा क्हाया हल्याळ, यल्लापूर, जांबोटी-जत व्हाया पारिश्वाड, एम. के. हुबळी, हेम्माडगा-सिंदनूर व्हाया बेकवाड, इटगी, नागरगाळी-कटकोळ व्हाया लालवाडी, चापगाव, इटगी, जांबोटी-रबकवी व्हाया पिरनवाडी तसेच कणबर्गी रोड, औराद-सदाशिवगड व्हाया अळणावर, रामनगर, गणेशगुडी तसेच बिडी-बेळवणकी व्हाया कित्तूर या राज्यमार्गांचा समावेश आहे.
सदर राज्यमार्ग खानापूर तालुक्याच्या हद्दीमधूनच जातात. या राज्यमार्गावर दिवसेंदिवस वाहतूक वाढतच चालली आहे. पण रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने विशेष पॅकेज योजना राबवून खानापूर तालुक्मयाच्या हद्दीतील रस्त्यांचा विकास साधावा, अशी मागणी होत आहे.
खानापूर-पारिश्वाड राज्यमार्गांचा विकास
तालुक्मयाच्या मध्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे जत-जांबोटी हा रस्ता तालुक्मयातील जांबोटीहून सुरुवात होतो. जांबोटी, खानापूर पारिश्वाड, एम. के. हुबळीमार्गे जतला जाणाऱया या रस्त्याची पार दुरवस्था झाली होती. पण या रस्त्यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी विषेश प्रयत्न करून या राज्यमार्गापैकी खानापूर ते पारिश्वाडपासून तालुक्याच्या हद्दीपर्यंत 20 कि. मी. रस्त्यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर करून विकास साधला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. याबद्दल प्रवासीवर्गातून समाधान होत आहे. या मार्गापैकी खानापूर ते जांबोटीपर्यंतचा बराच रस्ता खराब झाला आहे. उर्वरीत रस्ता लवकरच पूर्ण झाल्यास जत-जांबोटी राज्यमार्गापैकी तालुक्यातील या रस्त्याची संपूर्ण समस्या पूर्ण होणार आहे. खानापूर ते मोदेकोपपर्यंतचा रस्ता 9.9 मीटर रुंदीकरणात कोणती अडचण येणार नाही. पण यानंतर ओलमणीपर्यंत पुन्हा वनखात्याकडून अडचण येण्याची शक्यता आहे. यामुळे रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वीच ही अडचण दूर करून 9.9 मीटर रुंदीचा रस्ता झाल्यास याही राज्यमार्गाला विशेष महत्त्व येणार आहे.
खानापूर-तालगुप्पा या राज्य मार्गाची व्याप्ती शहराला बायपासला जोडा
तालुक्यातील खानापूर-तालगुप्पा राज्यमार्गाचा विकास झाला आहे. या राज्यमार्गावर बेळगावमार्गे मंगळूरला जाणाऱया वाहनांची संख्या अधिक आहे. हा रस्तादेखील 5.5 मीटर रुंदीचा आहे. या मार्गावर मात्र वनखात्याची अडचण येत नाही. या रस्त्यावर खानापूर तालुक्मयाच्या तसेच हल्याळ भागात अनेक वळणे आहेत. तालुक्मयातील बिडी गावातून जाणाऱया रस्त्याचा विकास करण्यात आला आहे. तसेच भुरूणकी क्रॉस, गस्टोळी दड्डी क्रॉस नजीकची वळणे हटवून ठिकठिकाणी रस्ता विकसित करण्यात आला आहे. राज्यमार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने सुसाट वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. या राज्यमार्गाची सुरुवात करंबळ कत्रीपासून होते. पण आता खानापूर शहराला बायपास महामार्ग होत असल्याने खानापूर शहरातून जाणाऱया जुन्या महामार्गाचा विकास करण्यासाठी खानापूर-तालगुप्पा या राज्यमार्गाची व्याप्ती शहराला बायपास होणाऱया मराठा मंडळ कॉलेजपासून करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
गोव्याला जाणाऱया रस्त्यांचा विकास पण धोका कायम
तालुक्मयात जाणाऱया राज्यमार्गापैकी बेळगाव-पणजी व्हाया चोर्ला मार्गाचा तसेच धारवाड-गोवा राज्यमार्गाचा सात-आठ वर्षापूर्वी बीओटी तत्त्वावर विकास करण्यात आला आहे. हे दोन्ही रस्ते गोव्याला जोडणारे आहेत. त्यामुळे या मार्गांची मोठी समस्या दूर झाली आहे. पण वेगवेगळय़ा कारणांमुळे राज्यमार्गाच्या रुंदीकरणाला अडथळे आल्याने रस्त्याची रुंदीदेखील मर्यादित स्वरुपात आहे. त्यावरून दोन्ही राज्यमार्ग चांगल्या दर्जाचे झाल्याने साहजिकच दिवसेंदिवस या मार्गावरून जाणाऱया येणाऱया वाहनांची संख्याही वाढली आहे. या रस्त्याच्या वळणदार तसेच अरूंद भागात अपघात घडत आहेत. सध्या 5.5 मीटर रस्ता रुंदीचे काम पूर्ण होऊन त्यामध्ये जोरात वाहतूकही सुरू आहे. पण जांबोटी ते चोर्ला दरम्यान रस्त्याला 26 वळणे आहेत. आधी रस्त्याची मर्यादित रुंदी व त्यामधील वळणे यामुळे सदर मार्गावर अपघात वाढत चालले आहेत. या रस्त्यावरची होणारी वाहतूक लक्षात घेता. हा रस्ता दोन्ही बाजूला आणखी दोन मीटर तरी रुंद होणे गरजेचे आहे. तरच या मार्गावरील वाहतूक सुखदायक होईल, अन्यथा वाहने चालवणेदेखील या मार्गावर धोकादायक बनले आहे. शिवाय बिडी, बेळवणकी व्हाया कित्तूर या रस्त्याचा विकास झाला आहे.
धारवाड-गोवा राज्य मार्गापैकी लिंगनमठ कत्री ते रामनगर 30 कि. मी. रस्ता खानापूर तालुक्याच्या हद्दीतून जातो. हा राज्यमार्ग औराद, सदाशिवगड या राज्य मार्गात मोडतो. हा रस्तादेखील इतका खराब झाला होता की, सात वर्षापूर्वी या रस्त्याचा विकास झाला आहे. लिंगनमठ कत्री ते रामनगरपर्यंत रस्ता करताना दोन्ही बाजूला असलेल्या जंगल संपत्तीमुळे बऱयाच अडचणी आल्या. हा रस्तादेखील 5.5 मीटर इतकाच रुंदीचा करण्यात आला आहे. या मार्गावरची वाहतूकदेखील मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. पण अरुंद रस्त्यामुळे वाढत्या वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत.
हेम्माडगा रस्त्याची वाहतूक वाढली
या राज्यमार्गाप्रमाणे तालुक्मयातून सुरुवात होणारा तिसरा राज्यमार्ग म्हणजे हेम्माडगा, रूमेवाडी क्रॉस तसेच बेकवाड, इटगीमार्गे सिंदनूरला जाणारा राज्यमार्ग आहे. यापैकी हेम्माडगा ते रूमेवाडी क्रॉस रस्त्याचा मागीलवषी विकास झाला आहे. पण हा रस्ता हेम्माडगामार्गे गोव्याला जाताना रामनगरपेक्षा फारच कमी असल्याने या रस्त्याची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. याकरिता केसीएफ योजनेतून याही राज्यमार्गाच्या विकासासाठी आमदार डॉ. निंबाळकर यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
नागरगाळी-कटकोळ राज्यमार्ग विकासापासून वंचित
तालुक्मयातून जाणारा आणखी एक राज्यमार्ग म्हणजे नागरगाळी-कटकोळ या मार्गांचा समावेश आहे. हा रस्ता नागरगाळी ते नंदगड तसेच लालवाडी, चापगाव ते अवरोळीमार्गे इटगीहून कटकोळला जातो. या रस्त्याचा विकास मात्र रखडला आहे. हलशी, नंदगडपर्यंत रस्त्याची अलीकडे सुधारणा झाली असली तरी उर्वरीत रस्ता खराब झाला आहे. लालवाडी-चापगाव ते कोडचवाडपर्यंतच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या विकासाचे घोंगडे भिजते राहिले आहे. त्याचप्रमाणे गोव्याला पिरनवाडी ते जांबोटीमार्गे जाणारा रस्ता जांबोटी ते रबकवी राज्यमार्गात मोडतो. या रस्त्याचा विकास झाला आहे. हा राज्यमार्ग बेळगाव तालुक्यातील कणबर्गी व्हाया रबकवीला जातो.
खानापूर तालुक्यातून उगम होणारे राज्यमार्ग
- खानापूर-तालगुप्पा क्हाया हल्याळ, यल्लापूर
- जांबोटी-जत व्हाया पारिश्वाड. एम.के.हूबळी
- हेम्माडगा-सिंदनूर व्हाया बेकवाड, इटगाr
- नारगाळी-कटकोळ व्हाया लालवाडी, चापगाव, इटगाr
- जांबोटी-रबकवी व्हाया पिरनवाडी तसेच कणबर्गीं रोड
- औराद-सदाशिवगड व्हाया अळणावर, रामनगर, गणेशगुडी
- बिडी-बेळवणकी व्हाया कित्तूर